'तारक मेहता'मधील 'या' कलाकाराने सलमानसोबत केलं सिनेसृष्टीत पदार्पण

सलमान खानच्या या सिनेमातून केलं पदार्पण 

Updated: May 26, 2021, 08:22 AM IST
'तारक मेहता'मधील 'या' कलाकाराने सलमानसोबत केलं सिनेसृष्टीत पदार्पण  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकल होतं. तारक मेहता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील जेठालाल यांची भूमिका साकरणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) यांना प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळालं आहे. दिलीप यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. 26 मे 1968 रोजी पोरबंदर येथे दिलीप जोशी यांचा जन्म झाला. टीव्ही मालिकाअगोदर दिलीप जोशी यांनी सिनेमातही आपलं नशिब अनुभवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dilip Joshi (@dilipjoshi_jethalal)

दिलीप जोशीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'वह क्या बात है', 'दो और दो पांच', 'कोरा कागज' सारख्या टीव्हीशोमध्ये काम केलं आहे. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, दिलीप जोशी यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. दिलीप जोशी यांनी 'मैंने प्यार किया', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'हम आपके हैं कौन' सारख्या सिनेमांत देखील काम केलं आहे. मात्र त्यांना खरी ओळख ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून मिळाली. 

दिलीप जोशी यांनी सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' सिनेमातून डेब्यू केलं आहे. सिनेमानंतर आता दिलीप जोशी मालिकेतून लोकप्रिय झाले आहेत. तारक मेहताचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. सध्या देशातील सर्वाधिक टीआरपीचा कार्यक्रम म्हणून तारक मेहता मालिकेचे नाव घेतले जाते. या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचे आहेत. मात्र यासगळ्यात जेठालालची गोष्ट वेगळी आहे. जेठालालची आताची कमाई ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

एकेकाळी जेठालालची रोजची कमाई ही 50 रुपये होती. आता तो आकडा लाखाच्या घरात गेला आहे. 52 वर्षीय कलाकार दिलिप जोशी हे एका गुजराती परिवारातून आले आहेत. लहानपणापासुन अभिनयाची आवड असणारे दिलिप जोशींना करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मिळण्यापूर्वी आपल्याला बराचकाळ संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तारक मेहताच्या मालिकेतील एक महत्वाचे नाव म्हणून जेठालाल यांचे नाव घ्यावे लागते. मागील 12 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तारक मेहता’च्या लोकप्रियतेमागे अभिनेता दिलीप जोशी उर्फ ‘जेठालाल चंपकलाल गडा’ यांचे योगदान महत्वाचे आहे.