पहिल्या अपयशी लग्नानंतर सिद्धांतनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच सोडली पत्नीची साथ

siddhaanth vir surryavanshi death : अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (siddhaanth vir surryavanshi ) यानं वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धांतची अकाली एक्झिट फक्त चाहत्यांनाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांनाही पुरती कोलमडून टाकणारी आहे. 

Updated: Nov 12, 2022, 07:38 AM IST
पहिल्या अपयशी लग्नानंतर सिद्धांतनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच सोडली पत्नीची साथ  title=
television Actor siddhaanth vir surryavanshi wife alesia raut

siddhaanth vir surryavanshi death : अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (siddhaanth vir surryavanshi ) यानं वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धांतची अकाली एक्झिट फक्त चाहत्यांनाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांनाही पुरती कोलमडून टाकणारी आहे. (Gym Workout) जिममध्ये वर्कआऊट करत असताना एकाएकी त्याच्यावर काळानं घाला घालणं ही बाब अजूनही त्याच्या (siddhaanth vir surryavanshi wife) पत्नीच्या पचनी पडलेली नाही. पहिल्या अपयशी लग्नानंतर सिद्धांतनं अलिसिया राऊत (alesia raut ) या रशियन अभिनेत्री- मॉडेलशी लग्नगाठ बांधली. पण, त्यांचा हा सहजीवनाचा प्रवास अर्ध्यावरच सोडत सिद्धांत निघून गेला. 

दोघांचंही हे दुसरं लग्न (Wedding)

अलिसिया आणि सिद्धांत या दोघांचंही हे दुसरं लग्न. आयुष्यानं भूतकाळात दाखवलेले सर्व दिवस विसरत ते दोघंही एकत्र आले होते. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. 

अलिसियाचं रशियन कलाजगतामध्ये मोठं नाव (alesia raut a russian model)

अलिसिया ही रशियम मॉडेल, वीजे आणि फॅशन कोरिओग्राफर आहे. खतरों के खिलाडी 4 या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. तिचे काही डान्स परफॉर्मन्सही विशेष गाजले. Officla Ramp Walk Trainer म्हणून अलिसियानं स्वत:ची वेगळी ओळखही तयार केली. तिचं स्वत:चं मॉडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटही आहे. 

वाचा : Gym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या

Femina Miss India आणि Miss India universe साठी ती काम करते. अलिसियाचं पहिलं लग्न रशियन इकोनॉमिस्टशी झालं होतं. या लग्नापासून तिला एक मुलगाही आहे. पण, तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2017 मध्ये तिनं आणि सिद्धांतनं लग्न करण्याचा निर्णय घेत आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात पदार्पण केलं. 

सर्वकाही सुरळीत असताना काळाचा घाला... 

अलिसिया आणि सिद्धांतच्या नात्यामध्ये सर्वकाही सुरळीत सुरु असताना एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि स्वप्न विखुरली. सध्याच्या घडीला सिद्धांतच्या (siddhaanth vir surryavanshi death news) नसण्यानं अलिसियाला मोठा धक्का बसला आहे. यातून सावरशील हे तिला सांगावं तरी कसं, हाच प्रश्न सर्वांना पडत आहे. कारण, तिच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर काही लहान नाही.