LOCKDOWN : रस्त्यावर फिरणाऱ्यांना अभिनेत्री म्हणते, 'काय रे एsss ... लग्न आहे का?'

पाहा, घराच्या गॅलरीतूनच तिने त्यांना रोखलं....   

Updated: Apr 1, 2020, 02:50 PM IST
LOCKDOWN :  रस्त्यावर फिरणाऱ्यांना अभिनेत्री म्हणते, 'काय रे एsss ... लग्न आहे का?'  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोना CORONAVIRUS व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना लॉकडाऊनची हाक दिली. देशहितासाठी आणि प्रत्येकाच्या आयुष्यासाठी म्हणून घेण्यात आलेल्या त्यांच्या या निर्णयाला अनेकांनीच पाठिंबा दिला. पण, काही अतिउत्साहींनी मात्र इथेही त्यांना ओसंडून वाहणारा उत्साह दाखवत घराबाहेर निघण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. 

पोलीस यंत्रणा, प्रशासन अशा सर्व मंडळींच्या नाकी नऊ आणणऱ्या या सर्वांवर आता एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने संताच व्यक्त केला आहे. 'अरे एsss, लग्न आहे का?', असा संतप्त सवालच तिने या अतिउत्साही मंडळींना विचारला आहे. 

ही अभिनेत्री म्हणजे अनिता हसनंदानी. अनिताने इन्स्टाग्रामवर एक टीकटॉक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती, घराच्या गॅलरीतून खाली पाहताना दिसत आहे. तिच्या इमारतीखाली असणाऱ्या रस्त्यावर लॉकडाऊनच्या काळातही असणारी माणसांची रहदारी पाहून तिचा संताप अनावर झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on

सर्व पद्धतींनी आणि सर्व स्तरावरील दिग्गजांनी पुढे येत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांना घरातच राहण्याचं आवाहन केलं. पण, काही केल्या या आदेशाचं अगदी काटेकोर पालन मात्र केलं जात नाही आहे. त्यामुळे आता अनेकांचाच संताप परिसीमा गाठत आहे. स्वयंशिस्त राखत जर, लॉकडाऊनचं गांभीर्याने पालन केलं, तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं सहज शक्य होणार आहे. पण, त्याची सुरुवात ही स्वत:पासून केली गेली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे.