'अनुपमा' एका एपिसोडसाठी घेते 'इतकं' मानधन; तीन महिन्यांचा खर्च भागूनही उरेल एवढा मोठा आकडा....

अनुमपा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रूपा गांगूलाही या मालिकेमुळे साराभाई VS साराभाई या मालिकेनंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

Updated: Aug 24, 2022, 08:50 PM IST
 'अनुपमा' एका एपिसोडसाठी घेते 'इतकं' मानधन; तीन महिन्यांचा खर्च भागूनही उरेल एवढा मोठा आकडा....   title=

Anupama Fees: 'अनुमपा' ही मालिका सध्या सगळीकडे प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील अनुपमा हे पात्र प्रेक्षकांच्या तर खासकरून महिला वर्गाच्या पसंतीस उतरले आहे. अनुमपा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रूपा गांगूलीलाही या मालिकेमुळे 'साराभाई VS साराभाई' या मालिकेनंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

'स्टार प्रवाहा'वरील 'आई कुठे काय करते' या मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हे सर्वच काम करणारे कलाकार वैयक्तिक आयुष्यातही काय करतात? याकडेही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. 

'स्टार प्लस'ची प्रसिद्ध मालिका 'अनुपमा' सलग 2 वर्षे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मालिकेच्या अनोख्या परंतु सध्या कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरक्ष: मोहित केले आहे. 'अनुपमा'च्या माध्यमातून निर्मात्यांनी छोट्या पडद्यावर अतिशय सोप्या पद्धतीने घर सांभाळणाऱ्या भारतीय महिलेच्या जीवनातील अडचणी आणि आव्हाने चित्रित केली आहेत.

प्रेक्षकांची मने जिंकण्यासोबतच हा शो टीआरपी रेटिंगची रेस सातत्याने जिंकत आला आहे. आता तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडला असेल की रुपाली गांगुली, गौरव खन्ना, सुधांशू पांडे अशा कलाकारांची नेट वर्थ किती असेल? चला तुम्हाला काही धक्कादायक आकडे आम्ही सांगतो. समोर आलेल्या माहितीनुसार अनुमपा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रूपाली गांगुली प्रत्येक एपिसोडसाठी 60,000 हजार एवढे मानधन घेते. तर तिच्याकडे एकूण 21 ते 25 कोटींची संपत्ती आहे. 

'अनुपमा' सीरियलमध्ये अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरवची एकूण संपत्ती $900 दशलक्ष आहे. अनुपमाचा पहिला पती वनराज शाहची भूमिका करणाऱ्या सुधांशूचीही एकूण संपत्ती 21 ते 25 कोटी रुपये आहे. सुंधाशु प्रत्येक एपिसोडच्या शूटिंगसाठी सुमारे 50,000 रुपये फी घेतो.

मदालसा शर्मा ही अभिनेत्री काव्या वनराज शाहची भूमिका साकारत आहे. जिची एकूण संपत्ती 14 ते 20 कोटींच्या दरम्यान आहे. मदालसा प्रत्येक एपिसोडसाठी 30,000 रुपये आकारते. ​परितोष शाहची भूमिका साकारणाऱ्या आशिषची एकूण संपत्ती 7 ते 10 कोटी इतकी आहे. तो एका एपिसोडसाठी 33,000 रुपये घेतो. किंजल शाह या नावाने घराघरात प्रसिद्ध झालेली निधी शाह एका एपिसोडच्या शूटिंगसाठी 32,000 रुपये आकारते. अलीकडे त्यांची एकूण संपत्ती 7 ते 10 कोटी आहे.