न्यायालयाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटावरील याचिका फेटाळली

सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटावर दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.

Updated: Apr 2, 2019, 03:08 PM IST
न्यायालयाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटावरील याचिका फेटाळली title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेला. चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील काही दिवसांपासून 'पीएम मोदी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक विरोधी पक्षांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विरोध होत होता. अखेर या वादाला दिल्ली उच्च न्यायालयाने पूर्णविराम लावला आहे. सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटावर दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश अनूप जयराम भामभानी यांच्या खंडपीठासमोर याचीका फेटाळण्यात आली आहे. 

वकील सुजीत कुमार सिंग द्वारे दाखल करण्यात आलेली याचीका न्यायालयाने फेटाळली आहे. आचारसंहिता सुरू असताना चित्रपट प्रदर्शित करू न देण्याची मागणी करण्यात आली होती.

बहुप्रतिक्षित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील गाण्यांनी आणि ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घातली आहे. 'मेरी धरती मुझसे पुछ रही...' या ओळीने सुरू झालेल्या गाण्यात भारत माता आणि जनतेचा संवाद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'सौगंध मुझे इस मिट्टी की ये देश नहीं झुकने दूंगा' असे नाव असलेल्या गाण्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी देशवासियांच्या सुरक्षेची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे.  

सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार रूपेरी पद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांनी केले आहे.