मराठी चित्रपटाचा परदेशात डंका; 'बाबा'चे लॉस एंजलिसमध्ये प्रदर्शन

वडील व मुलाच्या सुंदर नात्याभोवती 'बाबा' चित्रपटाची कथा फिरताना दिसते.

Updated: Oct 15, 2019, 07:51 PM IST
मराठी चित्रपटाचा परदेशात डंका; 'बाबा'चे लॉस एंजलिसमध्ये प्रदर्शन   title=

मुंबई : 'भावनेला भाषा नसते' अशा टॅगलाइन खाली साकारण्यात आलेल्या 'बाबा' या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन 'गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस'च्या 'हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स'साठी (एचएफपीए) झाली आहे. चित्रपटाचे निर्माते 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'च्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांनी याबाबत माहिती दिली. ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक कहाणी साकारण्यात आली आहे. वडील व मुलाच्या सुंदर नात्याभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते.  

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची निर्मिती असलेल्या 'बाबा' चित्रपटाची मोठी चर्चा होती. प्रदर्शनानंतर चित्रपटाला मोठा प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स यांच्याबरोबर 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे.

'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'कडून लवकरच नव्या चित्रपटाची घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे.

५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या 'गोल्डन ग्लोब्ज'च्या नामांकनांच्या यादीत चित्रपट प्रवेश करेल, अशी आमची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांनी व्यक्त केला आहे.