'या' कारणामुळे हाऊसफुल सिनेमे देणाऱ्या दादा कोंडके यांच्या घराची दुरवस्था

प्रथमेश परबने सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर सगळीकडे दादांच्या घराची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दादा कोंडके प्रतिष्ठाननं त्यांची बाजू मांडली आहे.

Updated: Jul 16, 2021, 08:13 PM IST
'या' कारणामुळे हाऊसफुल सिनेमे देणाऱ्या दादा कोंडके यांच्या घराची दुरवस्था title=

मुंबई: मराठी भाषेवरील मजबूत पकड, शब्दांचे सामर्थ्य, हजरजबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय म्हटलं की एकच नाव आठवतं ते म्हणजे अभिनेता दादा कोंडके. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातोटी. 'आये' हा शब्द तर जणू दादांचा कॉपीराईटच. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती. म्हणूनच त्यांचे सगळेच चित्रपट सुपरहीट ठरले. 8 ऑगस्ट 1932 रोजी दादा कोंडके यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव कृष्णादादा कोंडके होतं. त्यांचा 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांना खळखळून हसवलं. चंदू जमादार, राम-राम गंगाराम, राम राम आथमाराम, एकटाजीव सदाशिव हे होते. या चित्रपटांनी मराठीत चांगली कामगिरी केली, तर 'अंधेरी रात में दिया तेरे हाथ में' हा हिंदी सिनेमा खूप लोकप्रिय झाला.

प्रथमेशची भावुक पोस्ट, पण घराच्या अवस्थेवर दादा कोंडके ट्रस्टची बाजू खाली वाचा

सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. ही पोस्ट थोडी भावूक आहे. विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके superstar, दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो zoom करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्डने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का???? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित....!! प्रशमेशने शेअर केलेल्या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी यांवर चिंता व्यक्त केली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या कारणामुळे दादांच्या घराची दुरावस्था

प्रथमेश परबने सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर सगळीकडे दादांच्या घराची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दादा कोंडके प्रतिष्ठाननं त्यांची बाजू मांडली आहे. दादा कोंडके यांच्या घराबाबत फिरणाऱ्या पोस्टनंतर दादा कोंडके प्रतिष्ठान आपली बाजू मांडली. गेल्या काही वर्षांपासून या घराच्या वारसा हक्कावरून कोर्टात वाद सुरू आहे. त्यामुळे दादा कोंडके यांच्या घरासंदर्भात किंवा मालमत्तेसंदर्भात कायदेशीर मर्यादा आहेत. अर्थातच वाद कोर्टात असल्यानं या मालमत्तेच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप दादा कोंडके ट्रस्टला करता येत नाही. 

दादा कोंडके प्रतिष्ठाननं मांडली आपली बाजू

दादांनी आपल्या मृत्यूपत्रात आपली संपत्ती आणि मालमत्ता सांभाळण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करावी असं म्हटलं होतं. त्यानुसार 5 जणांची एक ट्रस्ट स्थापन करण्यात आली. या ट्रस्टने दादांच्या संपत्तीचं, घराचं मालमत्तेचं जतन करावं आणि गरजू कलाकारांना मदत करावी हा त्यामागचा हेतू होता. 

सध्या वारसाहक्कावरून कोर्टात खटला सुरू असल्यानं दादांचं घर आणि संपत्ती जशी पूर्वी होती तशीच जतन करण्यात अनेक मर्यादा येत आहेत असं दादा कोंडके प्रतिष्ठाननं आपली बाजू मांडली आहे. तसेच दादा कोंडके यांची संपत्ती आणि संबंधित जमिनीवर काही जण अतिक्रम करत असल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे. दादा कोंडके यांची 90 एकर जागा हेरिटेज म्हणून घोषित करावी अशी मागणी दादा कोंडके ट्रस्टमधील अभिनेत्री उषा चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केली होती.