दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ ऐवजी 'हा' अभिनेता हवा होता; अमृता खानविलकर जरा स्पष्टच बोलली

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. 'चंद्रमुखी' सिनेमा भेटीला आल्यानंतर या चित्रपटातील गाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होती. या चित्रपटातील 'चंद्रा' या लावणीवर अनेकजण नाचताना दिसले होते. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

Updated: Aug 29, 2023, 07:00 PM IST
दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ ऐवजी 'हा' अभिनेता हवा होता; अमृता खानविलकर जरा स्पष्टच बोलली title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती 'खुपते तिथे गुप्ते' या शोची. हा शो आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या शोचा तिसरा सीझन पाहण्यास प्रेक्षकांना चांगलाच आनंद होत आहे. सतत वादात असणाऱ्या या सीझनमध्ये आता अभिनेत्री अमृता खानविलकरला पाहायला मिळत आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. 'चंद्रमुखी' सिनेमा भेटीला आल्यानंतर या चित्रपटातील गाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होती. या चित्रपटातील 'चंद्रा' या लावणीवर अनेकजण नाचताना दिसले होते. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसलाआहे. मात्र आता या सिनेमातील दौलतरावच्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकरने मोठं वक्तव्य केलं आहे. 

नुकतीच अमृता खानविलकर झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत. नुकताच झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये दिसत आहे की, शोचा सुत्रसंचालक अमृताला एक फोटो दाखवतो हा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून चंद्रमुखी सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा आहे. हा फोटो पाहून यावर अभिनेत्री म्हणते, मला आजही असं वाटतं की, दौवत हे कॅरेक्टर ह्यांनीच करायला पाहिजे होतं. तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं द्यायला येतेय अभिनेत्री अमृता खानविलकर..! पहा, 'खुपते तिथे गुप्ते, 3 सप्टेंबर, रविवार, 9 PM.. येत्या ३ सप्टेंबरला हा एपिसोड आपल्याला झी मराठीवर पाहता येणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मागील दोन पर्वात अवधुत गुप्ते यांनी मनमोकळे प्रश्न विचारून अनेकांना बोलतं केलं होतं. दोन पर्वाच्या यशस्वी प्रयोगानंतर आता तिसरं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिसऱ्या पर्वात या आधी  अनेक राजकिय मंत्री उपस्थित राहिले आहेत. तर अनेक कलाकारांनीही या शोमध्ये उपस्थिती दर्शवली आहे.