बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच

This Actress wanted to date Rahul Gandhi : या अभिनेत्रीला करायचे होते माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट... अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना देखील इच्छा झाली नाही पूर्ण.

दिक्षा पाटील | Updated: Sep 21, 2023, 11:16 AM IST
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच title=
(Photo Credit : Kareena Kapoor Khan Instagram/ Social Media)

Kareena Kapoor Birthday Special : बॉलिवूड कलाकार हे नेहमीत त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. ते कुठे जातात... कोणाला भेटतात... त्यांच्या पार्टीत कोण येत... आता सध्या चर्चा कोणत्या कपलची आहे... अशा अनेक गोष्टी या चर्चेचा विषय ठरतात... त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही कलाकारांच्या अफेअर्सची होते. त्यातही अनेक सेलिब्रिटी हे आपल्याला एकत्र अनेकदा स्पॉट झाल्याचे दिसते. तर दुसरीकडे त्यांना कोणता सेलिब्रिटी आवडतो किंवा ते कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, याविषयी देखील अनेकदा मुलाखतींमध्ये उघड होतं. त्यात बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' आणि सिमीगरेवालच्या शोमध्ये अनेक कलाकार हे त्यांना कोणत्या सेलिब्रिटीला डेट करायची इच्छा आहे, हे सांगून जातात. त्यात आता एका अभिनेत्रीची माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीला डेट करण्याची इच्छा अपूर्णच राहिली. 

सिमी गरेवालच्या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अनेक कलाकारांनी त्यांना कोणत्या सेलिब्रिटीला डेट करायला आवडेल याविषयी सांगितलं आहे. Rendezvous with Simi Garewal या शोमध्ये करीनानं खुलासा केला की तिला राहुल गांधी यांना डेट करायचे आहे. करीनानं केलेल्या या वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीनाशिवाय या कार्यक्रमात संजय लीला भन्साली, जॅकी श्रॉफ, गोविंदा, राकेश रोशन यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्या कलाकारांनी देखील त्यांना कोणाला डेट करायला आवडेल याविषयी सांगितले आहे. संजय लीला भन्साली यांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नाव घेतलं आहे. तर जॅकी श्रॉफ यांनी सुष्मिता सेन, राकेश रोशन आणि गोविंदा यांनी अभिनेत्री रेखा यांना डेट करायला आवडेल असे सांगितले होते. 

हेही वाचा : अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

करीनाविषयी बोलायचे झाले तर करीनानं तिचा आज तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. करीनाही लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांची लिस्ट ही कधीच कमी होत नाही. ती अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते. इतकंच नाही तर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 10.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील नेहमीच व्हायरल होताना दिसतात.