Ex-Boyfriend सोबत बेड शेअरींगसाठी तयार झाली 'ही' अभिनेत्री; 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्वीस्ट

This Ex couple is ready to share bed together in bigg boss 17 : 'बिग बॉस 17' मध्ये हे एक्स कपल शेअर करणार बेड... अभिनेत्री खुलासा करत म्हणते

दिक्षा पाटील | Updated: Oct 21, 2023, 12:40 PM IST
Ex-Boyfriend सोबत बेड शेअरींगसाठी तयार झाली 'ही' अभिनेत्री; 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्वीस्ट title=
(Photo Credit : Social Media)

This Ex couple is ready to share bed together in big boss 17 : सोशल मीडियावर सध्या 'बिग बॉस 17' हा चर्चेचा विषय आहे. या घरात सुरु असलेला ड्रामा सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. यंदाच्या सीझनमध्ये काही कपल्स काही सिंगल्स आणि काही सिंगल्स आले आहेत. त्यात सगळ्यांचे लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे या सीझनमध्ये एक्स कपल अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिनेता अभिषेक कुमार हे देखील आले आहेत. नुकतंच ईशानं सांगितलं की तिला अभिषेकसोबत बेड शेअर करण्यास काहीही तक्रार नाही. आता स्पर्धक मन्नारा चोप्रानं ईशाच्या या गोष्टीवर रिअॅक्ट करत असं काही म्हटलं आहे की ईशा आणि मन्नारा यांच्यात भांडण झालं आहे. 

या कार्यक्रमात बिग बॉसनं ईशा मालवीयला अभिषेक कुमारसोबत दिल रूममध्ये जाण्याविषयी प्रश्न विचारतात. जेव्हा तिला विचारण्यात आलं की ती दिलच्या रुममध्ये कोणासोबत जायला आवडेल, तर तिनं उत्तर देत सांगितलं की तिला अभिषेक कुमार, ईशानं म्हटलं की तिनं त्याला माफ केलं आहे आणि त्याच्यासोबत एक नवी सुरुवात करायची आहे. 

पाहा व्हिडीओ -

हेही वाचा : अंकितासाठी सुशांतचा 'तो' अखेरचा मेसेज! काय म्हणाला होता अभिनेता

मन्नारा चोप्रा ही अभिषेकशी बोलत होती की तू मुलीला तुझ्यासोबत घेऊन जा, त्यानं ईशाला राग येतो आणि ती म्हणते की असं कोणाविषयी बोलायला नको. मला तुमच्यात नका खेचू आणि माझ्याविषयी नॉर्मल पद्धतीनं बोला. तुमच्यासाठी हे खूप साधारण असू शकतं पण मला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. मन्नारा ईशाविषयी आणखी बोलताना दिसली की तिची इच्छा आहे की तू दिलच्या रुममध्ये रहायला हवे आणि तुझ्यासोबत बेड शेअर करण्यासाठी ती तयार आहे. माझ्या असं म्हणणं आहे की ती तुझी एक्स गर्लफ्रेंड आहे आणि तिला तिच्या एक्ससोबत झोपण्यासाठी काही आक्षेप नाही. त्यावर अभिषेक बोलतो की हा गेम आहे. प्रत्येक सीझनमध्ये लोक बेड शेअर करतात याचा अर्थ असा नाही की ते रिलेशनशिपमध्ये आहेत. तर मन्नार लगेच यावर डिटेलमध्ये चर्चा करताना दिसते. तिचा आणि अभिषेकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट करत अभिषेक आणि ईशाला ट्रोल केलं आहे.