या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

Updated: Nov 10, 2017, 10:59 AM IST
या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडिओत एका तरूणीने ‘लैला’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करून अनेकांची झोप उडवली आहे. या गाण्यावर ‘रईस’ सिनेमात सनी लिओनीने डान्स केला होता. सनीच्या डान्सला या तरूणीने तगडी टक्कर दिली आहे. 

मुस्कान सिंह या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. तरूणीने इतका सुंदर डान्स केलाय की, तिची चर्चा जोरदार रंगली आहे. कदाचित तिला या व्हिडिओमुळे मोठी संधीही मिळू शकते. कारण गेल्या काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना चांगल्या संधी मिळाली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल ३१ लाख लोकांनी पाहिलं आहे. 

या तरुणीचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल की, सनी लिओनीपेक्षा हिने चांगला डान्स केलाय.