'ही' आहे मधुगंधा कुलकर्णीच्या आयुष्यातील घुमा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

मधुगंधा शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शमध्ये लिहीलंय की, ''माझी चिमा. आहे माझी घुमा. घराची दाराची राणी असे ती चिमा. 

Updated: May 14, 2024, 08:04 PM IST
'ही' आहे मधुगंधा कुलकर्णीच्या आयुष्यातील घुमा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो title=

मुंबई : मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या टीमची ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली.  ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ सध्या प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरलेला आहे.  या सिनेमात मधुगंधाने निर्मीतीसोबतच या सिनेमात अभिनयही केला आहे. एकीकडे सिनेमाचा बोलबाला असतानाच नुकतीच मधुगंधाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मधुगंधा शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शमध्ये लिहीलंय की, ''माझी चिमा. आहे माझी घुमा. घराची दाराची राणी असे ती चिमा. तुरुतुरू तिचं चालणं टकामका तिचं पाहणं. पायातला सुस्साट वेग कमी झाला आहे...पण कधी ती गुरगुरणारी आणि फुरफुरणारी आहेच ! आवाजातला दणका तसाच आहे.. तू अशीच आरोग्य संपन्न आणि आखरनंदी राहा... दीर्घायुषी तू आहेसच. हॅप्पी बर्थडे चिमाबाई... घुमाबाई.. लव्ह यू. तिच्या या पोस्टवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.'' सध्या मधुगंधाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मधुगंधाने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये तिचा पाळीव कुत्रा दिसत आहे. पहिल्या फोटोत मधुगंधा चिमा (पाळीव कुत्रा) तर दुसऱ्या फोटोत परेश मोकाशी मधुगंधा, चिमा आणि अजून बरेच पाळीव कुत्रे दिसत आहेत. मधुगंधाने हे फोटो चिमाच्या वाढदिवसानिमीत्त शेअर केले आहेत. चिमा आणि मधुगंधाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी या फोटोवर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षावही केल्याचं पहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मधुगंधा कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मधुगंधा मालिका, चित्रपट नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनयाबरोबर ती एक उत्तम लेखिकाही आहेत. एलिझाबेथ एकादशी,  चित्रपट चांगलाच गाजला. निर्मिती असलेला आत्मपॅम्फ्लेट चित्रपट काही महिन्यांपूर्वी भेटीला आला होता.