कोरोनाच्या काळात मालदीवमध्ये फिरणाऱ्या कलाकारांवर शोभा डे भडकल्या

हे काही फॅशन विक नाही, असं म्हणत सारा, दिशावर भडकल्या शोभा डे 

Updated: Apr 26, 2021, 02:04 PM IST
कोरोनाच्या काळात मालदीवमध्ये फिरणाऱ्या कलाकारांवर शोभा डे भडकल्या  title=

मुंबई : देशातील अनेक राज्यात कोरानाने पुन्हा आपले हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाने अनेक कलाकारांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. मधल्या काही काळात काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली. यानंतर अनेक कलाकारांनी मुंबई सोडून मालदिवला जाण पसंत केलं. (This is not fashion week: Shobhaa De calls people holidaying at Maldives amid COVID-19 pandemic insensitive idiot) अनेक कलाकार देश संकटात असताना मुंबई सोडून गेले आहेत. यावर नवाजुद्दीन पाठोपाठ लेखिका शोभा डे कलाकारांवर चांगल्याच भडकल्या आहेत. 

शोभा डे यांनी कलाकारांवर रागवत एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की,'कलाकारांनी आपले फोटो पोस्ट करणं चुकीचं आहे. तुम्ही भाग्यवान आहात, या परिस्थितीतही तुम्हाला एवढा चांगला ब्रेक मिळू शकतो. पण सगळ्यांवर एक मेहरबानी करा आणि तुमचे फोटो खासगी ठेवा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shobhaa De (@shobhaade)

पुन्हा एकदा शोभा डे यांनी कलाकारांवर राग जाहीर केला आहे. 'कलाकार सुट्टया घालवत आहेत. आणि फोटोजेनिक एटॉलवर जगत आहेत. अशा परिस्थितीत असंवेदनशील राहण्यासारखं आहे. भारतात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत्येकजण आपला पैसा आणि आपला वेळ म्हणत या गोष्टी करत आहेत. प्रत्येक जण काय सोनू सूद नसतं?'

शोभा डे यांनी रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि दीया मिर्झाबद्दल लिहिलं आहे की,' आपण का कारण शोधायचं?  एवढा मोठा हा काही अपराध नाही. बस करा आता. जे कलाकार मोठ्या घरात राहतात, मास्क घालण्याचे सल्ले देतात. ते आता सनकिस्ड शॉट पोस्ट करत आहे. दीया मिर्झा लकी आहे. तिच्या बेबी बंपवर 'ओ' करणारे चाहते आहेत.'