बॉलिवूडच्या मोठ्या स्टारसोबत काम करणाऱ्या या बालिवूडच्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड आपल्याला सर्रास पहायला मिळतो

Updated: Mar 19, 2022, 04:50 PM IST
बॉलिवूडच्या मोठ्या स्टारसोबत काम करणाऱ्या या बालिवूडच्या अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड आपल्याला सर्रास पहायला मिळतो. हा ट्रेंण्ड म्हणजे सिने स्टार्सच्या लहानपणीचे फोटो शेअर करुन त्यांना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. असाच एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि  या गोंडस चिमुरडीला ओळखण्याचं चॅलेंज चाहत्यांना दिलं जात आहे.

लाखो लोकं प्रयत्न करूनही चाहते या मुलीला ओळखू शकले नाहीत. मोठी झालेली ही मुलगी साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. बॉलीवूडमधील अनेक हिट चित्रपटांचाही ती एक भाग आहे. तिने केवळ साऊथच्याच नाही तर बॉलीवूडच्याही अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे.

तुम्‍ही अजूनही तिला ओळखलं नसेल तर आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, हा फोटो आहे अभिनेत्री असीनच्या लहानपणीचा. असिनने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. असिनने आमिर खान, सलमान खान आणि अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, असिन थोट्टूमकलचा जन्म २६ ऑक्टोबर १९८५ ला केरळ राज्यातील कोचीन येथे एका कॅथोलिक कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचं नाव जोसेफ थोट्टुमकल असून ते मूळचे थोडूपुझा येथील आहेत. त्यांनी आपला बिझनेस बंद करून आपल्या मुलीच्या अभिनय क्षेत्रात तिला मदत करण्याचा घेण्याचा निर्णय घेतला. ते अनेक व्यवसायांशी निगडीत होते आणि एक प्रसिद्ध बिझनेसमन होते. असिनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्माशी लग्न केलं आणि अभिनयातून ब्रेक घेतला. तिला चार वर्षांची मुलगी आहे.

गजनी हा हिंदी चित्रपट तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर तिने. 'गजनी', 'रेडी', 'बोल बच्चन', 'ऑल इज वेल' अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत साकारल्या.