बॉलिवूडचा 'हा' विवाहीत अभिनेता राखी सावंतला करतो असे मेसेज, राखीने दाखवले चॅट

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 24, 2022, 03:19 PM IST
बॉलिवूडचा 'हा' विवाहीत अभिनेता राखी सावंतला करतो असे मेसेज, राखीने दाखवले चॅट title=

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. राखीचे व्हिडीओ हे नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. नुकताच राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लग्न झालेला एका बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्याने तिला केलेले मेसेज राखीने दाखवले आहेत. 

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी दुसरा कोणता बॉलिवूड अभिनेता नाही तर राखी सावंत विषयी बोलताना दिसते. हे दोघे खऱ्या आयुष्यातही खूप चांगले मित्र आहेत. बऱ्याचवेळा कोणत्या कार्यक्रमात हे दोघं मस्ती करताना दिसतात. आता राखीने रणवीर सिंगचे चॅट दाखवले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पापाराझी राखीला सांगतात की रणवीर सिंग तुला फॉलो करतो. यावर राखी म्हणाली, 'हो तो माझा मित्र आहे आणि ते सुद्धा खूप चांगला.  त्याने मला आय लव्ह यू पण म्हटलंय.' यानंतर राखी आदिलसोबत मस्ती करते आणि बोलते, पण हे आय लव्ह यू तसं नाही आहे.' या गोष्टीला आदिलही शांतपण घेतो. त्यानंतर राखीनं तिचे चॅट व्हिडीओत दाखवले. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 

राखी आणि आदिलच्या मस्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आदिल आणि राखीची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. या दोघांचे चाहते राखी आणि आदिलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकदा राखी तिच्या आणि आदिलच्या लग्नाविषयी बोलतानाही दिसते, मात्र आतापर्यंत राखीने तिचं आणि आदिलचं लग्न कधी होणार याची पुष्टी केलेली नाही.

यादरम्यान, राखी सावंतनं रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबाबतही चर्चा केली. रणवीर सिंग न्यूड होण्याचे कारण राखी सावंतने या व्हिडीओत सांगितले आहे. जेव्हा पापाराझींनी राखी सावंतला रणवीर सिंगच्या न्यूड फोटोबद्दल प्रश्न केला तेव्हा राखी संतापली आणि म्हणाली की, 'तुम्हाला नग्न वाटतं, तुमचे डोळे नग्न आहेत. मला कुठूनही तो नग्न होताना दिसत नाही. माझ्या रणवीर मित्राबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. आदिलही काही बोलू शकत नाही.'