कंगनाच्या नव्या सिनेमात 'हा' दाक्षिणात्त्य अभिनेता दिसणार प्रभु रामाच्या भुमिकेत?

या चित्रपटाचं नावं  सीता द इनकार्नेशन असं असणार आहे. 

Updated: Oct 7, 2022, 09:23 PM IST
कंगनाच्या नव्या सिनेमात 'हा' दाक्षिणात्त्य अभिनेता दिसणार प्रभु रामाच्या भुमिकेत?  title=

Kangana Ranuat New film Sita: सध्या आदिपुरूष (Adipurush) या सिनेमामुळं सगळीकडेच वातावरण तापलं आहे. रामायणातील अजरामर व्यक्तिरेखेंच्या लुकचं चुकीचं प्रदर्शन केल्यानं प्रेक्षकांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्यात या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत असताना कंगना राणावतच्या (Kangana Ranaut Movie) नव्या चित्रपटानं सध्या सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. (this south indian actor going play lord ram in bollywood actress kangana ranaut new film sita)

हा चित्रपटही रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचं नावं  सीता द इनकार्नेशन (Sita the Incarnation) असं असणार आहे. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

गेल्या वर्षी अलौकिक देसाई दिग्दर्शित सीता द इनकार्नेशनमध्ये कंगना रणौत देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. वृत्तानुसार हा चित्रपट वेगळा असेल. या चित्रपटात सीता या पात्राभोवती कथानक असणार आहे. 

आत्तापर्यंत निर्मात्यांनी कंगनाच्या भुमिकेविषयी जाहीर सांगितले होते परंतु आता कंगनानंतर काही खास कलाकारांचीही नावं समोर आली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नुकत्याच हीट ठरलेल्या पोनीयिन सेल्वन (Ponniyyin Selvan) स्टार चियान विक्रम या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.काही दिवसांपूर्वी देसाई यांनी विक्रम(Actor Vikram) यांची भेट घेतली ज्याचा फोटो इन्टाग्रामवर व्हायरल होतो आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार कंगनाच्या चित्रपटात चियान विक्रम प्रभु रामाच्या भुमिकेत दिसणार आहेत. चियान या चित्रपटाचा भाग असतील की नाही याबद्दल ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही परंतु कंगनाच्या आगामी चित्रपटात असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. 

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

अशीही माहितीसमोर येते की कंगनाच्या ऐवजी करिना कपूरची निवड कलाकारांनी केली होती. करिना नंतर निर्मात्यांनी कंगनाशी संर्क साधला 

दरम्यान, चियान विक्रम सध्या पोनियिन सेल्वनच्या सुपर यशाचा आनंद घेत आहे. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन यांच्याही भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तो रु.चा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील 250 कोटींची कमाई उत्कृष्ट आहे.