...'या' प्रश्नाचं उत्तर देत ती ठरली Miss Universe 2019

पाहा या यशानंतर तिने केलेली भावनिक पोस्ट 

Updated: Dec 9, 2019, 02:43 PM IST
...'या' प्रश्नाचं उत्तर देत ती ठरली Miss Universe 2019 title=
Miss Universe 2019मधील काही खास क्षण....

अटलांटा : Miss Universe 2019 या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी अटलांटा येते झालेल्या एका अतिशय दिमाखदार सोहळ्यात पार पडली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबीनी टुंझी Zozibini Tunzi  हिला मानाच्या Miss Universe 2019 या किताबानं गौरवण्यात आलं. 

अतिशय मानाच्या अशा या स्पर्धेत झोजिबीनी ही एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देत सर्वांची आणि विशेष म्हणजे परीक्षकांची मनं जिंकून गेली. Miss Universe 2019ने तुम्हाला गौरवण्यात आलं, तर मुलींना कोणती गोष़्ट शिकवाल?, असा प्रश्न व्यासपीठावरील सौंदर्यवतींना विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर देत झोजिबीनी म्हणाली, 'नेतृत्वक्षमतेचा अभाव गेल्या काही वर्षांत मुलींमध्ये पाहायला मिळत आहे. बरं त्यांना नेतृत्व करयाचं नाही असं नाहीच आहे. इथे समाज त्यांना असं करण्यापासून रोखत आहे. आपल्यात तितकी ताकद आहे. या विश्वात आपण सर्वशक्तिसाली आहेत आणि आपल्यालाही संधी मिळालीच पाहिजे' असं म्हणत मुलींनी समाजात आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे असा सूर तिनं आळवला. 

जागतिक पातळीवरील या स्पर्धेतील यशानंतर Miss Universe 2019 विजेत्या Zozibini Tunzi हिची सोशल मीडिया पोस्टही बरंच काही बोलून गेली. 'आज ते दार उघडलं आणि त्यातून जाण्याच मी स्वत:ला अतिशय नशीबवान समजलं. या क्षणाला अनुभवणाऱ्या प्रत्येक लहान मुलीने तिच्या स्वप्नांमध्ये असणाऱ्या ताकदीवर कायम विश्वास ठेवावा', असं तिने एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. मी मोठ्या गर्वाने माझं नाव सांगते, झोजिबीनी टुंझी, मिस युनिव्हर्स !