आता इतक्या मोठ्या घरात राहणार टायगर श्रॉफ...

अलिकडेच आलेल्या बागी २ सिनेमाने टायगर श्रॉफला चांगलेच मालामाल केलेले दिसते.

Updated: Jul 24, 2018, 01:46 PM IST
आता इतक्या मोठ्या घरात राहणार टायगर श्रॉफ... title=

मुंबई : अलिकडेच आलेल्या बागी २ सिनेमाने टायगर श्रॉफला चांगलेच मालामाल केलेले दिसते. कारण त्यामुळे टायगरच्या स्वप्नातील घर साकार झाले आहे. त्यासाठी त्याने खास तयारी देखील सुरु केली आहे. 

स्वप्न साकार

काही दिवसांपूर्वी टायगर मुंबईत घराच्या शोधात असल्याची खबर आली होती. घरात त्याला ८ बेडरुम्स हवे होते. पण आता या शोध थांबला आहे आणि टायगरला त्याच्या स्वप्नातील घर मिळाले आहे. २०१९ च्या शेवटापर्यंत टायगर नवीन घरात शिफ्ट होईल.

याने केले इंटिरिअर

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार येथे टायगरने ८ बेडरुम्सचे घर खरेदी केले आहे. या घराचे इंटिरिअर डिजाईनिंग जॉन अब्राहमचा भाऊ एलेनने केले आहे. यापूर्वी त्याने अनेक सेलिब्रेटींचे घर डिजाईन केले आहे.
सध्या टायगर 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातून दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. एक आहना पांडे आणि दुसरी तारा सुतारिया. २०१२ मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' सिनेमातून आलिया, सिद्धार्थ आणि वरुणने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते.

बागी २ ने मारली बाजी

बागी २ सिनेमातून टायगर गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत झळकला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असून अनेक रेकॉर्ड तोडले. या सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते.