थ्रिल आणि सस्पेंस असलेल्या 'अक्सर २', पाहा चित्रपटाचा ट्रेलर

 लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणारा चित्रपट अक्सर २ चा ट्रेलर २८ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान खान सोबत डेब्यू करणारी झरीन खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 28, 2017, 09:29 PM IST
थ्रिल आणि सस्पेंस असलेल्या 'अक्सर २', पाहा चित्रपटाचा ट्रेलर  title=

मुंबई :  लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणारा चित्रपट अक्सर २ चा ट्रेलर २८ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान खान सोबत डेब्यू करणारी झरीन खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

झरीन सोबत टीव्हीचा फेमस अभिनेता गौतम रोडे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिकेटर श्रीसंत ही एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शीत केले आहे. इमरान हाश्मी आणि उदिता गोस्वामी यांच्या अक्सर या चित्रपटाचा सिक्वल आहे. 

 

या चित्रपटात गौतम एका बँकरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटाची शुटींग भारत आणि मॉरिशसमध्ये करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.