भल्याभल्यांना एसीत घाम फुटला, जान्हवी कपूरचा HOT LOOK एकदा बघाच!

जान्हवीचा बोल्ड लूक सध्या सर्वांनाच घायाळ करताना दिसतोय.

Updated: Sep 21, 2022, 10:40 PM IST
भल्याभल्यांना एसीत घाम फुटला, जान्हवी कपूरचा HOT LOOK एकदा बघाच! title=

Janhvi Kapoor Bold Look: बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एक आहे. जान्हवीने बॉलीवूडमध्ये आपल्या साधेपणाने आणि दमदार अभिनयाने मागील काही वर्षात वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमधील व्यस्थ अभिनेत्रीमध्ये जान्हवी कपूरचा समावेश आहे. अशातच जान्हवीचा किलर लूक सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Janhvi appeared in a short orange colored outfit Bold Look)

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी जान्हवीने अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. पुर्वी मीडिया आणि कॅमेरापासून लपून राहणारी जान्हवी आता आधीसारखी राहिली नाही. ती खुलेआम कॅमेराला सामोरं जाते. जान्हवीचा बोल्ड लूक (Janhvi Kapoor Bold Look) सध्या सर्वांनाच घायाळ करताना दिसतोय.

Janhvi Kapoor

 

नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जान्हवीने ग्लॅमरचा तडका लावला आहे. तिचा हॉट लूक पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर देखील विश्वास बसला नाही. एका इव्हेंटला जात असतानाचा जान्हवीचा फोटो व्हायरल झालाय. यामध्ये जान्हवी ऑरेंज कलरच्या शॉर्ट आऊटफिटमध्ये दिसून आली. इव्हेंटमध्ये सर्वांच्या नजरा जान्हवीवरच खिळल्या होत्या.

दरम्यान, काळाच्या ओघात जान्हवी अधिक आत्मविश्वासू आणि बोल्ड होत चालली आहे, असं तिच्या चाहत्यांनी म्हणणं आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास देखील दिसून येतोय. अनेकदा पार्टीमध्ये उपस्थिती राहून ती अनेकांना घायाळ देखील करते.