'अपुन से पंगा लेगा', तैमूरच्या पावलावर पाऊल ठेवतोय बेबोचा लहान मुलगा, पाहा VIDEO

...Kareena Kapoor आणि सैफ डोक्याला हात मारून घेतील.

Updated: Sep 18, 2022, 05:58 PM IST
'अपुन से पंगा लेगा', तैमूरच्या पावलावर पाऊल ठेवतोय बेबोचा लहान मुलगा, पाहा VIDEO title=
trending news kareena kapoor and saif ali khan jehangir ali khan look on camera nm

Kareena Kapoor Son: अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) हे बी टाऊनमधील (B Town) सर्वात हिट आणि फेमस कपल आहे. सोशल मीडियावर या दोघांचे सर्वात जास्त फ्लोवर्स आहेत. या दोघांसोबतच यांची मुलं तैमूर (Taimur ) आणि जहांगीर (Jehangir) उर्फ जेह (Jeh) यांचं सोशल मीडियावर (Social media) आतापासून मोठ्या चाहत्या वर्ग आहे. लहानपणी तैमूरची एक झलकसाठी कॅमेऱ्यामॅन सतत सज्ज असायचे...आता जेहचे हावभाव टिपण्यासाठी त्यांची धावपळ असते. 

तैमूर आणि जेह सोशल मीडियावर नेहमीच हिट असतात. तैमूरचे फोटो पूर्वी ज्या पद्धतीने व्हायरल व्हायचे अगदी तसेच जेहचे फोटोही इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतात. अलीकडे जेहचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती बॉलीवूडचे 'पापाराझी' (Paparazzi) कडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. पण त्याची आया जेहला या पापाराझीपासून दूर येण्याचा प्रयत्न करत आहे.  (trending news kareena kapoor and saif ali khan jehangir ali khan look on camera nm)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता जेहल पापाराझीकडून त्यांच्या कॅमेऱ्यात टिपल्या गेला. तो मोठ्या उत्साहाने सगळं बघतं होता. त्याची आया त्याला हात पकडून घेऊन जात होती, पण त्याने तो हात सोडवला आणि जमिनीवर बसून कुतूहलाने बघत होता. या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप पसंती मिळतं आहे. एका यूजर्सने म्हटलं आहे की, जे वाचून करीना आणि सैफ डोक्याला हात मारून घेतील. तो म्हणाला की, 'अपुन से पंगा लेगा'...असं काहीसं लूक जेहचं दिसतं आहे. 

हा व्हिडीओ पाहून तैमूरच्या लहानपणाची आठवण नक्की होते. तैमूरला सांभाळणारी आयाचं आता जेहचा सांभाळ करत आहे. जेहचा हट्टीपणा पाहून आयाने तिला उचलून घेतलं आणि घरात घेऊन गेली.