बॉलिवूडमधील 'या' स्टार्सचा यमराजलाच चकवा, चाहत्यांसोबत बॉलिवूडचाही थांबला होता श्वास

ती परफॉर्मन्स संपवून बॅक स्टेजवर पोहोचली तेव्हा शोमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. 

Updated: Aug 27, 2022, 06:12 PM IST
बॉलिवूडमधील 'या' स्टार्सचा यमराजलाच चकवा, चाहत्यांसोबत बॉलिवूडचाही थांबला होता श्वास title=
trending news these famous celebrities defeated death raju srivastava sai dharam tej amitabh bachchan to preity zinta entertainment gossips

Celebrities Defeated Death: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 15 दिवसांपासून जगण्यासाठी संघर्ष करत आहे. व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर आता अखेर राजू श्रीवास्तव हे शुद्धीवर आले आहेत. चाहत्यांनी राजू श्रावास्तव यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी पूजा-अर्चा केली आहे. एखाद्या सेलिब्रिटीने यमराजाला चकवा देण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटी हे मरण्याचा दारातून परते आहेत. तुम्हाला त्या सेलिब्रिटींची नावं माहिती आहे का? आज आपण त्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊयात.  (trending news these famous celebrities defeated death raju srivastava sai dharam tej amitabh bachchan to preity zinta  entertainment gossips)

राजू श्रीवास्तव

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. 15 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी अखेर मृत्यूची ही लढाई जिंकली असून त्यांना शुद्धी आली आहे.

साई धरम तेज

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टॉलिवूडचा सुपरस्टार साई धरम एका भरधाव रस्त्यावर अपघाताचा बळी ठरला होता. या अपघातात अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो अनेक दिवस आयसीयूमध्ये भर्ती होता.

शबाना आझमी

18 जानेवारी 2020 मध्ये शबाना आझमी यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात झाला होता. या अपघातात शबाना गंभीर जखमी झाल्या होत्या. अनेक दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अमिताभ बच्चन

कोरोना महासंकटातील पहिल्या लाटेत अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती, मात्र बिग बींनी हार मानली नाही आणि कोरोनावर मात केली. 

ऋषी कपूर

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी कर्करोगावर मात केली आहे. सुमारे एक वर्ष ऋषी यांनी न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेतले. हळूहळू अभिनेताही या आजारातून बरा झाला. मात्र आज ऋषी कपूर आपल्यामध्ये नाहीत. 

प्रिती झिंटा

अभिनेत्री प्रीती झिंटानेही मृत्यूला परवले आहे. प्रीती श्रीलंकेतील कोलंबोमधील एका शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेली होती. यावेळी जेव्हा प्रीती ती परफॉर्मन्स संपवून बॅक स्टेजवर पोहोचली तेव्हा शोमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बातमीने संपूर्ण मीडिया हादरला होता. 

महिमा चौधरी

1999 मध्ये 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री महिमा चौधरीचा ट्रकसोबत अपघात झाला होता. या अपघातात अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. एका मुलाखतीदरम्यान महिमाने खुलासा केला की, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिच्या चेहऱ्यावरील काचेचे 67 तुकडे काढण्यात आले होते. 

सनी लिओनी

अभिनेत्री सनी लिओनीनेही मृत्यूला टाळले आहे. सनी लिओनी आणि तिचा नवरा एका विमान अपघातात मरता मरता वाचले आहेत. या भीषण अपघातातून पायलटही सुखरूप घरी परतला होता.