Shehnaaz Gill पुन्हा प्रेमात, सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सारत 'या' अभिनेत्याला करतेय डेट, VIDEO व्हायरल

Shehnaaz Gill Video : पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल ही पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगत आहेत. शहनाज सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) ला विसरली का असा प्रश्न नेटकरी विचारतं आहे. 

Updated: Jan 11, 2023, 02:34 PM IST
Shehnaaz Gill पुन्हा प्रेमात, सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सारत 'या' अभिनेत्याला करतेय डेट, VIDEO व्हायरल title=
trending video Shehnaaz Gill Kiss guru randhawa and Shehnaaz looking hot viral on Social media marathi news

Shehnaaz Gill Kissing Video :  'बिग बॉस'(Bigg Boss)मधून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी शहनाज गिल (shehnaaz gill) सध्या खूप चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण या व्हिडीओमध्ये शहनाज एका अभिनेत्याला किस करताना दिसतं आहे. त्यामुळे शहनाज सिद्धार्थ शुक्लाला विसरली का? तिने आपल्या आयुष्याला पुन्हा सुरुवात केली असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेहनाजचे चाहते अनेक कमेंट करत आहेत. 

Shehnaaz Gill पुन्हा प्रेमात?

आता आम्ही तुम्हाला सांगतो की, नेमकं आहे तरी काय...तर ते असं आहे की, शहनाज आणि गुरू रंधावा यांच्या एक मुझ्यिक व्हिडीओमधील काही दृश्यं ते छोट्या व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांचे मोस्ट अवेटेड गाणे 'मून राइज' रिलीज झालं आहे. या व्हिडीओमध्ये प्रेम, प्रेम भंग आणि प्रेयसीच्या आठवणीत रमलेला प्रियकर असा फ्लॅशबॅक या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आला आहे. शहनाज गिल या व्हिडीओमध्ये खूप क्यूट, हॉट दिसतं आहे.  (trending video Shehnaaz Gill Kiss guru randhawa and Shehnaaz looking hot viral on Social media marathi news)

व्हिडीओ व्हायरल 

हे गाणे शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा जोडीला पसंती दिली आहे. या  व्हिडीओमधील दोघांची रोमँटिक शैली पाहिला मिळते. या गाण्याच्या प्रत्येक ओळी तुमच्या हृदयात घरं करतात.

यादोघींनी लवकरच लग्न करावे, असं नेटकरी म्हणतं आहेत. दरम्यान शहनाज गिल कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. दुसरीकडे शहनाजच्या बॉलिवूड डेब्यूचीही जोरदार चर्चा आहे. यापूर्वी एका व्हिडीओमध्ये शहनाज प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिलसोबत दिसली होती. त्या व्हिडिओमध्ये शहनाजने जस्सीचा हात पडकल्याचं दिसतं होतं. त्यावेळीही नेटकरी हा व्हिडीओ पाहून गोंधळून गेले होते.