बर्थ डे गर्ल शाल्मली खोलगडे बाबत '६' इंटरेस्टिंग गोष्टी

बॉलिवूड, मराठी सिनेमे, हिंदी रिएलिटी शो नंतर आता थेट मराठी रिअ‍ॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा' या शोमध्ये शाल्मली आज परीक्षकाच्या भूमिकेत आहे.  अनेक मराठी घराघरात पोहचलेली शाल्मली खोलगडे आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे.  

Updated: Jan 2, 2018, 12:14 PM IST
बर्थ डे गर्ल शाल्मली खोलगडे बाबत '६' इंटरेस्टिंग गोष्टी  title=

मुंबई : बॉलिवूड, मराठी सिनेमे, हिंदी रिएलिटी शो नंतर आता थेट मराठी रिअ‍ॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा' या शोमध्ये शाल्मली आज परीक्षकाच्या भूमिकेत आहे.  अनेक मराठी घराघरात पोहचलेली शाल्मली खोलगडे आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे.  

चुलबुल स्वभावाच्या शाल्मलीबाबत तुम्हांला या काही गोष्टी ठाऊक आहेत का ?  

शास्त्रीय संगीत घरात  

शाल्मली खोलगडे या हरहुन्नरी गायिकेला गाण्याचे बाळकडू घरातच मिळाले. तिची आई उमा खोलगडे या  शास्त्रीय गायिका असून त्यांनीच शाल्मलीवर सुरूवातीच्या काळात भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे दिले.  त्यानंतर शुभदा पराडकरांकडे शाल्मली गाणं शिकली. 

अभिनेत्री शाल्मली खोलगडे  

शाल्मली गायिका, परफॉर्मर आणि अभिनेत्रिदेखील आहे. २००९ साली ईस्ट इंडियन कम्युनिटीच्या 'तू माझा जीव' या कोकणी मराठी चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या रूपात सिनेमात झळकली होती. 

पबमध्ये गायची 

बॉलिवूडमध्ये संधी मिळण्यापूर्वी शालमली मुंबईतील अनेक प्रख्यात पब, कॅफेमध्ये इंग्रजी गाणी गात असे. शाल्मलीला इंग्रजी गाण्याची ओळख आणि आवड तिच्या मोठ्या भावामुळे लागली. 

बॉलिवूडमधील ब्रेक   

संगीतकार अमित त्रिवेदीने शाल्मलीला बॉलिवूड देण्यापूर्वी तिला अमेरिकेत 'एल ए म्युझिक अ‍ॅकॅडमी'मध्ये इंग्रजी गाणं शिकण्याची इच्छा होती. त्या कॉलेजमध्ये तिने अप्लायही केलं होते. मात्र अमितने दिलेल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगमुळे तिने पुढे अमेरिकेत जाण्याचे टाळले.   शाल्मलीला ' परेशान' हे गाण्याने बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. 

२०१२ साली 'परेशान' गाण्यानंतर मुझे तो तेरी लथ, बेबी को बेस पसंत है, अशी अनेक बॉलिवूड गाणी गायली आहेत.  

मराठी गाणी 

बॉलिवूडमध्ये आपल्या गाण्याने वेड लावणार्‍या शाल्मलीने मराठी सिनेमातही पार्श्वगायन केलं आहे. 'पुणे ५२' चित्रपटातही तिने गाणं गायलं आहे. तसेच हॅप्पी जर्नी चित्रपटातील  'फ्रेश' गाणंही शाल्मलीने गायलं आहे. 

'बियॉन्से'ची चाहती  

इंग्रजी गायिका 'बियॉन्से'ची शाल्मली चाहती आहे. असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.  सोबतच अमित त्रिवेदीच्या 'देव डी ' या चित्रपटाच्या गाण्याची शाल्मली चाहती होती.