रमजानमध्ये रोजा नाही ठेवत! वक्तव्यानंतर उर्फी जावेद कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर

Urfi Javed : उर्फी जावेदनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रजमानमध्ये रोजा ठेवत नाही असं सांगितल्यानंतर तिला कट्टरपंथीयांनी ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 21, 2024, 11:54 AM IST
रमजानमध्ये रोजा नाही ठेवत! वक्तव्यानंतर उर्फी जावेद कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर title=
(Photo Credit : Social Media)

Urfi Javed : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि हटके फॅशनमुळे उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. त्याशिवाय तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे ती चर्चेचा विषय ठरते. ज्यामुळे ती सतत सगळ्यांच्या निशाण्यावर राहते. आता उर्फीनं असं काही वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे रमजानचा उपवास आहे. तिनं केलेलं वक्तव्य हे काही कट्टर विचार सरणीच्या लोकांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

उर्फी जावेदला सुरुवातीला सांगितलं की तू तुझ्या चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा देशील. त्यानंतर उर्फी सगळ्यांना शुभेच्छा देते. तर त्यानंतर ती बोलते की ईद येते तर त्याच्यासाठी ती आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. त्यानंतर उर्फीला विचारण्यात आलं की रमजान सुरु आहे, तर ती उपवास ठेवते का? तर उर्फीनं सांगितलं की "नाही, नाही मी उपवास ठेवत नाही. माझ्या घरचे ठेवतात. मी त्यांच्यासोबत इफ्तारीला बसते. त्यांचा आदर म्हणून." उर्फीचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला की "तिनं नरकात तिचं रिजर्वेशन केलं आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "थोडी तर लाज बाळग. उर्फीचे चाहते तिचा आदर करत आहे. त्यांचं म्हणणं आहे की उपवास ठेवा किंवा नका ठेवू ही त्यांची मर्जी आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "त्यांचं वाईट नशिब की तू त्यांच्या घरी जन्माला आलीस." आणखी एक म्हणाला, "गॅरेन्टी नरकात जाणार." आणखी एक नेटकरी म्हणाला की "लाज वाटायला हवी तुला." 

हेही वाचा : 'मीच तिथं येतो थांबा...' म्हणत भर गर्दी उभ्या चाहत्यांकडे गेला थलपती विजय; VIDEO पाहून म्हणाल कसला कमाल आहे हा

उर्फी विषयी सांगायचं झालं तर तिचा नुकताच एक ड्रेस प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यात उर्फीनं यूनिवर्स म्हणजेच आकाश गंगेचा ड्रेस बनवला होता. तिचा हा हटके ड्रेस नेटकऱ्यांना प्रचंड आवडला. तर हा ड्रेस दाखवत उर्फी म्हणाली की 'सेंटर ऑफ यूनिवर्स' आहे. कारण तिच्या चारही बाजुला आकाश गंगा फिरत आहे. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांना पहिल्यांदा तिची स्टाईल आवडली आहे.