जेव्हा 8 डिग्री सेल्सियसमध्ये Urfi नं घातले तसे कपडे, झाली अशी अवस्था की...

ती तिच्या लूकबद्दल सतत ट्रोल होत असते.

Updated: Oct 16, 2022, 10:02 PM IST
जेव्हा 8 डिग्री सेल्सियसमध्ये Urfi नं घातले तसे कपडे, झाली अशी अवस्था की... title=

Urfi Javed viral Video: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती उर्फी जावेदची (Urfi Javed). तिच्या विचित्र फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशनवरून जसे सगळेच तिची खिल्ली उडवतात त्याप्रमाणे तिच्यावर प्रेम करणारे तिचे अनेक चाहतेही आहेत. (Urfi Javed Fashion) नुकताच उर्फीनं आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवशीही (Urfi Javed Birthday) उर्फी ट्रोलिंगपासून वाचली नाही. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी मात्र तिचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. (urfi javed go viral again after sharing a video on instagram)

टीव्ही इंडस्ट्रीमधून करिअरची सुरुवात करणारी उर्फी जावेद (Urfi Javed Trolled) सध्या तिच्या विक्षिप्त कपड्यांमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. फॅशनचा विचार केला तर उर्फी सगळ्याच्या पुढे आहे. खुद्द रणवीर सिंगलाही (Ranveer Singh Urfi Javed) तिच्या फॅशनचं कौतुक करणं थांबवता आलं नाही. तिचा ड्रेसिंग सेन्स वेगळा आहे त्यामुळे उर्फी सतत चर्चेत असते. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

उर्फी कुठेही गेली की ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसते, मग ते विमानतळ असो किंवा पार्टी. जरी ती तिच्या लूकबद्दल सतत ट्रोल होत असली (Urfi Javed Spotted) तरी अनेकदा तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षावही होतो. 

 

या वर्षाच्या सुरुवातीला उर्फी जावेदने तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओसाठी शूट केलं होतं. हा म्युझिक व्हिडिओ (Urfi Javed Music Video) एका थंड ठिकाणी शूट करण्यात आला होता जिथे तापमान -8 अंश होते. उर्फी जावेदने या ठिकाणी शूट करण्यासाठी तिनं नेहमीप्रमाणे ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता. 

या शूटचाच एक व्हिडिओ देखील उर्फीनं तिच्या इन्टाग्राम अकांऊटवर (Urfi Javed Instagram Post) शेअर केला होता ज्यामध्ये ती तिच्या सहकलाकारासोबत गाणं गाताना दिसत होती. तिनं वन शॉल्डर क्रॉप टॉप आणि गुलाबी रंगाचा स्कर्ट घातला होता. बर्फाळ भागात असे कपडे परिधान केल्याने उर्फी जावेदची प्रकृती बिघडली होती. ती थंडीने थरथरत होती आणि तिच्या सहकलाकाराला पुन्हा पुन्हा मिठी मारत होती. 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.