‘उरी’ने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’टाकले मागे

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सिनेमाला मागे टाकले.

Updated: Jan 13, 2019, 02:19 PM IST
‘उरी’ने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’टाकले मागे title=

मुंबई:वर्षाच्या सुरूवातीला दोन महत्वाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' आणि ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सिनेमाला मागे टाकले. 2016 साली जम्मू - काश्मिरमध्ये उरी  हल्ल्यात दहशदवाद्यांनी भारतीय सैनिकांनवर हल्ला केला. 18 सप्टेंबर 2016 साली उरी मध्ये झालेल्या स्फोटात 19 भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.तर संजय बारू यांच्या वादग्रस्त पुस्तकावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'ने बाजी मारली आहे.

Image result for the accidental prime minister zee news

‘उरी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ८.२० कोटी रुपयांचा गल्ला   जमवला तर ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या गल्ल्यामध्ये ४.५० कोटी जमले आहे.
दोन्ही सिनेमांपैकी ‘उरी’सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आकडेवारी ट्विटरवर शेअर केली