सुरुवातही सारखीच आणि शेवटही तोच; जाणून घ्या सुशांत सिंह आणि वैशाली ठक्कर यांच्यातील खास नातं

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने नुकतीच आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं आहे.

Updated: Oct 17, 2022, 07:14 PM IST
सुरुवातही सारखीच आणि शेवटही तोच; जाणून घ्या सुशांत सिंह आणि वैशाली ठक्कर यांच्यातील खास नातं title=

Vaishali Thakkar Sushant Singh Rajput : ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने नुकतीच आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं आहे. ती अनेक प्रकारे अभिनेता सुशांत सिंग राजपूतसारखी आहे. दोघांमध्ये खूप घट्ट नातंही होतं.  याविषयी अधिक जाणून घेऊया..

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण 'ससुराल सिमर का' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या शीर्ष मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण होती. वैशाली ठक्कर हिने इंदूर येथे राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तिचा मित्र सुशांत सिंग राजपूत यानेही अशाच प्रकारेच आपलं आयुष्य संपवलं होतं.   

प्राथमिक तपासानुसार वैशालीने प्रेमप्रकरणातून हे कृत्य केलं आहे आणि वैशालीने २०२१ मधील या फोटोतील व्यक्तीसोबत साखरपुडाही केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोविड काळात वैशालीचे लग्न होणार होतं, पण त्यावेळी तिने हे लग्न पुढे ढकललं होतं आणि त्यानंतर याबद्दल काहीही अपडेट नव्हती.

एका जुन्या मुलाखतीत वैशालीने सुशांतच्या मृत्यूला खून असल्याचं म्हटलं होतं आणि जेव्हा तिला रिया दोषी असल्याचं विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, यामागे तिच्याशिवाय अजून कोणीही नाही आणि रियाला नक्कीच वाचवलं जात आहे.

सुशांत आणि वैशाली, हे दोघंही खूप चांगले मित्र होते. दोघंही छोट्या शहरातून आले होते. दोघांनीही टीव्हीमधून करिअर सुरू केलं होतं आणि दुर्दैवाने दोघांचा शेवट सारखाच होता.