VIDEO: वर्षा उसगावकरांचं गोव्यातलं आलिशान घर पाहिलंत? नेटकरी विचारतात, 'आम्हाला कधी नेणार घरी'

Varsha Usgoankar Goa Home Video : सेलिब्रेटींच्या घरात (Marathi Celebrity houses) आपण नेहमीच डोकावून पाहत असतो. कोणी कधी कुठे नवं घर घेतलं आहे त्याचसोबत त्या घराची किंमत किती आहे याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सध्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या घराचीही झलक पाहण्यासाठी सर्वच जणं उत्सुक आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 27, 2023, 07:54 PM IST
VIDEO: वर्षा उसगावकरांचं गोव्यातलं आलिशान घर पाहिलंत? नेटकरी विचारतात, 'आम्हाला कधी नेणार घरी' title=
varsha usgaonkar new goa house video with onscreen daughter in law gauri viral on instagram

Varsha Usgoankar Goa Home Video : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे कुठल्या नव्या जुन्या सेलिब्रेटींनी घर घेतलंय किंवा घेण्याच्या तयारीत आहेत याची. सध्या इंटरनेटवर चर्चा रंगली आहे ती म्हणजे सई ताम्हणकरनं घेतलेल्या नव्या घराची. यंदा अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रीचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या नव्या घराची सध्या सर्वत्रच चर्चा पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांच्या गोव्याची घराची सर्वत्रच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

वर्षा उसगावकर यांच्या अभिनयाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. सध्या त्यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक रील शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा रील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

यावेळी त्यांनी त्यांच्या गोवातल्या घराची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या गोव्यातल्या घराचती सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांनी यावेळी त्यांच्या घराचा इनसाईड व्हिडीओ हा शेअर केला आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यांचे इनसाईड घराचा लुक पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप एक्ससाईड झाले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. चला तर पाहुया वर्षा उसगावकर यांचा गोव्यातल्या घराचा हा इंटरेस्टिंग व्हिडीओ. सध्या वर्षा उसगावकर यांची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सध्या ही मालिका अगदी घराघरात पोहचली आहे. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र जोरात चर्चा आहे. 

हेही वाचा : आयरा खाननंतर आता आमिर खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर.. अरे, बापलेक यांना झालंय काय?

यावेळी वर्षा उसगावकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी म्हणजे गिरीजा प्रभु हिच्यासोबत घरात प्रवेश केला आणि मग त्यांनी वर्षा उसगावकर यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी वर्षा उसगावकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'प्रिय गौरी तुझे माझ्या गोव्याच्या घरात गणेश चतुर्थीनिमित्त खूप खूप स्वागत.' यावेळी त्यांच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या घराच्या लुककडे पाहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओखाली म्हटलंय की आता आम्हाला कधी नेणार?