Good News : Varun Dhawan होणार बाप? पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ समोर येताच एकच चर्चा

Varun Dhawan and Natasha Dalal Good News : वरुण धवण आणि नताशा दलाला यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर वरुणच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 8, 2023, 03:36 PM IST
Good News : Varun Dhawan होणार बाप? पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ समोर येताच एकच चर्चा title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Varun Dhawan and Natasha Dalal Good News : बॉलिवूडमध्ये एकामागे एक गूड न्यूज आपल्याला मिळत आहे. आता अभिनेता वरुण धवण (Varun Dhawan) आणि त्याची पत्नी नताशा दलाला (Natasha Dalal) आता त्यांच्या चाहत्यांना गूड न्यूज देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्या दोघांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

वरुण धवण आणि नताशा दलालचा हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वरुण आणि नताशा क्लिनीकमधून बाहेर आल्याचे दिसत आहे. नताशानं पोलका डॉटचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे. तर वरुणनं निळ्या रंगाचा फूल स्किन फीट टी-शर्ट आणि काळ्या रंगाची ट्रॅक परिधान केली आहे.  फक्त तिथेच नाही तर त्यांच्या काही फॅनपेजवर देखील व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, वरूण आणि नताशाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'अॅसिडीटी सुद्धा असू शकते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्यांना ताप सुद्धा येऊ शकतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जर गूड न्यूज असेल तर चांगलंच आहे ना. पण बिचारे ते सेलिब्रिटीज त्यांची प्रायव्हसी टिकवून नाही ठेवू शकतं. घराच्या बाहेर निघाले तरी सेलिब्रिटीज दिसतात.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ते आजारी सुद्धा असू शकतात. त्यांना पर्सनल स्पेस द्या.' एक नेटकरी म्हणाला, 'याचा अर्थ आपला भाऊ वरुण प्रेग्नंट झालाच.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कोणी आजारी पण असू शकतो. प्रत्येकवेळी गूड न्यूज असेलच असं नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बिचारे डॉक्टरांकडे सुद्धा जाऊ शकत नाही. काही असेल तर ते स्वत: सांगतिल, तुम्ही असं काही बोलण्याची गरज नाही.' एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही तर आपल्या शेजारी राहणाऱ्या काकूंसारखं बोलत आहात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Preity Zinta Visit kamakhya temple: 'प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...', प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत

वरुण धवन आणि नताशा दलाल हे जानेवारी 2021 रोजी लग्न बंधनात अडकले. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी सप्तपदी घेतल्या. तर काही मोजक्याच कलकारांनी त्यांच्या लग्नात हजेरी लावली होती. वरुण आणि नताशा हे दोघेही लहानपणीचे मित्र आहेत. ते दोघं बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, ETimes नं देखील सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.