वरुणनचे ६ पॅक अॅब्स पाहून तापसीने म्हणाली 'प्लीज जेवून घे'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा 'जुडवा २' हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 28, 2018, 07:56 PM IST
वरुणनचे ६ पॅक अॅब्स पाहून तापसीने म्हणाली 'प्लीज जेवून घे' title=
Image: @Varun_dvn/@taapsee

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा 'जुडवा २' हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.

'जुडवा २' हा सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. मात्र, वरुण आणि तापसी यांनी पडद्यावर केलेल्या भूमिकेतून अद्याप बाहेर आले नसल्याचं दिसत आहे. कारण, सोशल मीडियात वरुण-तापसी यांच्यात सध्या जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर तसचं वाटतयं.

अभिनेता वरुणने आपल्या ट्विटर हँडलवर ६ पॅक अॅब्सवाला एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तापसीने त्यावर कमेंट करत म्हटलं की, "प्लिज जेवन करुन घे, नाही तर मी लाली आंटीला कॉल करेल".

तापसीने केलेल्या या कमेंटवर वरुणने लगेचच कमेंट करत म्हटलं की, "हाहा तु पराठा खाल्लास आणि बोलावलं नाही".

वरुणने केलेल्या या कमेंटनंतर तापसीने पुन्हा या कमेंटवर रिप्लाय केला. "घर तु नवं बनवलं आहेस, बोलावलं नाहीस आणि माझ्याकडून पराठा मागतोयस, घोर कलयुग" असं तापसीने म्हटलयं. 

१६ फेब्रुवारीला रिलीज होणार तापसीचा 'दिल जंगली'

अभिनेत्री तापसी पन्नूचा 'दिल जंगली' हा आगामी सिनेमा असून त्याचे दोन गाणेही रिलीज झाले आहेत. 'दिल जंगली' या सिनेमात लव्ह, फ्रेंडशिप, ब्रोमांस सर्वकाही पहायला मिळणार आहे. हा सिनेमा १६ फेब्रुवारी रोजी देशभरातील सिनेमागृहातं प्रदर्शित होणार आहे.

१३ एप्रिल रोजी रिलीज होणार 'अक्टूबर'

वरुण धवनचा 'अक्टूबर' हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून वरुण एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.