विकी कौशलच्या वॉलपेपर आहे या अभिनेत्रीचा फोटो; पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

विक्की कौशलच्या फोनचा वॉलपेपर खूपच क्यूट आहे. विक्कीने त्याच्या वॉलपेपरवर एका अभिनेत्रीचा फोटो ठेवला आहे.   

Updated: Feb 29, 2024, 03:06 PM IST
विकी कौशलच्या वॉलपेपर आहे या अभिनेत्रीचा फोटो;  पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडचं फेवरेट कपल आहेत. हे कपल सोशल मीडियावर त्यांचे फोटोज सतत शेअर करत असतात. सेलिब्रिटी हे फोटो शेअर करताच व्हायरल होतात. विक्की आणि कतरिना एकमेकांना कायमच सपोर्ट करतात. ज्यामुळे चाहते त्यांच्यावर फिदा असतात. विक्की त्याची पत्नी कतरिनावर खूप प्रेम करतो. त्याने त्याच्या वॉलपेपरवर एका अभिनेत्रीचा फोटो ठेवला आहे. जो पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. खरंतर शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

विकी कौशलने त्याच्या वॉलपेपरवर ठेवलेल्या अभिनेत्रीचा फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून अभिनेत्री कतरिना कैफचा आहे. या फोटोत दिसणारी कतरिना खूपच लहान दिसतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विकी कतरिनाविषयी बोलताना दिसला. यावेळी अभिनेत्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. यावेळी पुन्हा त्याने कतरिनाविषयी सांगितलं आहे, त्याने त्याच्या चाहत्यांना त्याच्या फोनवरचा वॉलपेपर दाखवला. जो पाहून तुम्हीही म्हणाल किती क्यूट आहे हा वॉलपेपर. 
 
कतरिनाच्या बालपणीचा फोटो लावला वॉलपेपरवर
जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विक्की कौशलने खुलासा केला आहे की, त्याने कतरिना कैफच्या बालपणीचा फोटो त्याच्या वॉलपेपरवर लावला आहे. या फोटोत कतरिना खूप क्यूट दिसत आहे. तिने दोन पोनी बांधल्या आहेत. आणि क्यूट स्माईल देत पोज दिली आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

विक्कीच्या वॉलपेपर पाहून चाहते खूश होत आहेत. हा फोटो समोर येताच चाहत्यांना यावर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहीलं., हा फोटो किती क्यूट आहे. तर अजून एकाने लिहीलंय,  खूपच गोड दिसायची अभिनेत्री लहानपणी. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या फोटोवर करत आहेत. 

२०२१ साली विक्की कौशल आणि कतरिना लग्नबंधनात अडकले. या जोडीने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटूंबीय आणि त्यांच्या जवळचे मित्र उपस्थित होते. हे कपल सतत त्याचे रोमँन्टिक फोटोज शेअर करुन त्यांच्या चाहत्यांना खूश करत असतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफ शेवट मेरी ख्रिसमस या चित्रपटात दिसली होती. तर विकी कौशल  लव्ह अँड वॉरमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्क्रिन शेअर करणार आहे.