व्हिडिओ : आकाशच्या साखरपुड्याचा आनंद नीता अंबानींनी असा केला व्यक्त

अंबानींच्या 'एन्टिलिया' या राहत्या घरीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

Updated: Jun 29, 2018, 03:11 PM IST
व्हिडिओ : आकाशच्या साखरपुड्याचा आनंद नीता अंबानींनी असा केला व्यक्त title=

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा गुरुवारी पार पडला. या भव्य समारंभात बॉलिवूड, क्रिकेट आणि व्यावसायिक वर्तुळातील अनेक चर्चित चेहरे दाखल झाले होते. यावेळी नीता अंबानी यांनी सादर केलेलं नृत्य सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. 

अंबानींच्या 'एन्टिलिया' या राहत्या घरीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आकाशच्या प्री इंगेजमेंट पार्टीत मुकेश अंबानींचे लहान भाऊ अनिल अंबानींही उपस्थिती लावली. ते पार्टीत मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानीसोबत गप्पा करताना दिसले.

 

Mom nita ambani performs at sons engagement party .... its a delight to see her dancing #akashambani #shlokamehta #mukeshambani #nitaambani #ishaambani #anantambani

A post shared by Nita Ambani (@nitaambani5) on

पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्सनी उपस्थिती लावली. किंग खान शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत उपस्थित होता. तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही पार्टीत वर्णी लावली.