डेटींगची इच्छा व्यक्त केल्यानंतर Vijay Deverkonda सारा अली खानला म्हणतो, ''तूला माझं प्रेम, मिठी आणि...''

सेलिब्रेटींच्या लव्ह अफ्वेअर, डेटिंगच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. 

Updated: Jul 13, 2022, 07:58 PM IST
डेटींगची इच्छा व्यक्त केल्यानंतर Vijay Deverkonda सारा अली खानला म्हणतो, ''तूला माझं प्रेम, मिठी आणि...'' title=

मुंबईः आजकाल बॉलीवूड स्टारकीड्समध्ये डेटिंग आणि सेटिंगची बरीच चर्चा होताना दिसतेय. कधी सारा कार्तिकसोबत दिसते नाहीतर अथिया के.राहूलसोबत परंतु कोण कोणास डेट करतंय हे कळायला मात्र काहीच मार्ग दिसत नाहीये. त्यातून सध्या 'कॉफी विथ करन' हा सर्वात जास्त कॉन्ट्राव्हर्शियल ठरलेला कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. सेलिब्रेटींच्या लव्ह अफ्वेअर, डेटिंगच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. 

'कॉफी विथ करन'चा नुकताच सातवा सिझन सुरू झाला आहे. सिझनच्या सुरूवातीलाच करन जोहरच्या आगामी चित्रपटाचे हिरो हिरोईन आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. करन जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे त्यानिमित्तानेच या दोघांनी करनच्या शोमध्ये हजेरी लावली होती. 

'कॉफी विथ करन'मध्ये नुकत्याच जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोन जिवलग मैत्रिणी आल्या होत्या. त्याचा प्रोमो हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात सारा अली खानने साऊथचा हिरो विजय देवरकोंडाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर तिच्या या वक्तव्यावरून चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वळले आहे. साराला करनने तेव्हा तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दलही विचारलं होतं आणि त्यावर साराने उत्तर द्यायचं टाळलं होतं. त्यातून ती असं म्हणाली होती की सगळ्यांचेच एक्स असतात. यापुर्वी जेव्हा सारा कॉफी विथ करनच्या शोमध्ये तिच्या वडिलांसोबत आली होती तेव्हा तिने कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

येत्या सिझनमध्ये विजय देवरकोंडाला मला डेट करायला आवडेल अशी इच्छा साराने व्यक्त केली, ही इच्छा व्यक्त केल्याबरोबरच विजय देवरकोंडाने तो प्रोमोचा व्हिडीओ शेअर करत त्यावर साराला रिप्लाय दिला आहे त्यात तो म्हणतो, ''तू ज्याप्रकारे माझे आडनाव घेतेस देवरकोंडा...ते खूपच क्यूट आहे'', असं म्हणत विजय देवरकोंडाने तूला माझ्याकडून मिठी आणि प्रेम असं म्हणतं सारा आणि जान्हवीला टॅग केलं आहे.. 

सारा अली खान सध्या सिंगल असून तिची आणि कार्तिक आर्यनच्या रिलेशनशिप्सची बरीच चर्चा सुरू होती.