विक्रम भट्ट यांनी का लपवली दुसऱ्या लग्नाची गोष्ट?

विक्रम भट्ट यांनी का लपवलं आपलं दुसरं लग्न? एक वर्षानंतर केला खुलासा 

Updated: Oct 7, 2021, 11:26 AM IST
विक्रम भट्ट यांनी का लपवली दुसऱ्या लग्नाची गोष्ट?  title=

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी श्वेतांबरी सोनीसोबत एका वर्षापूर्वी लग्न केलं. हे लग्न  त्यांनी तब्बल एक वर्ष लपवून ठेवलं. विक्रमने त्याच्या लग्नाबद्दल माहिती दिली तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. विक्रम भट्टने उघड केलं की, त्याने आपल्या घरी एका खाजगी समारंभात त्याच्या तीन बहिणी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केलं. दिग्दर्शकाने असेही उघड केले की, त्यांनी सुरुवातीला एका भव्य लग्नाची योजना आखली होती.मात्र, कोरोना साथीच्या रोगाने त्यांनी नियोजन बिघडवलं.

जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या अगोदर ते तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2016 मध्ये त्यांची पहिली भेट झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षे डेट केले. त्यानंतर, त्यांना वाटले की,हे नाते पुढील घेऊन जायला हरकत नाही. मात्र त्याच दरम्यान निर्मात्याचे वडील रुग्णालयात दाखल होते आणि त्यांची अँजिओप्लास्टी होणार होती. श्वेतांबरीच्या लक्षात आले की जर त्यांच्यापैकी कोणालाही काही झाले तर त्यांना एकमेकांशी फोनवर बोलता येणार नाही. 

लग्न होऊनही, या जोडप्याने एक वर्षापेक्षा जास्त काळ त्यांचे नाते लपवून ठेवले. कारण त्यांची मुले या लग्नाला परवानगी देईपर्यंत ते वाट पाहत होते. विक्रमला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे, तर श्वेतांबरीला दोन मुलगे आहेत. विक्रम पुढे असेही म्हणाला की वयाच्या ५२ व्या वर्षी हे वेडे प्रेम प्रकरण नाही तर ते एक "समाधानी आणि आनंदी संबंध" आहे.

श्वेतांबरीबद्दल मोकळेपणाने बोलताना विक्रम म्हणाले की, त्यांना श्वेतांबरीबद्दल एक गोष्ट आवडते. आणि ती म्हणजे तिचा खरेपणा आहे. ती हुशार आहे. ती मनोरंजनाच्या जगाशी संबंधित नसल्यामुळे तिला भेटल्यावर खूप वेगळा अनुभव मिळतो. तिच्या घरी गेल्यावर एक वेगळाच अनुभव मिळतो.