PM Narendra Modi trailer: गुजरात संकटात असतानाचा नरेंद्र मोदींचा भावूक अंदाज पाहिला?

 पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीचे हे विविध पैलू प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत. 

Updated: Mar 21, 2019, 08:55 AM IST
PM Narendra Modi trailer: गुजरात संकटात असतानाचा नरेंद्र मोदींचा भावूक अंदाज पाहिला?  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आल्यानंतर काही चित्र बदलली. चहा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीपासून, संन्यासी मार्गाचा अवलंब करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. तर, मोदींच्या प्रत्येक भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधलं. ही सर्व परिस्थिती पाहता दिग्दर्शक ओमंग कुमारने हा प्रवास एका चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 

विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असणआऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक पाहता देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीचे हे विविध पैलू प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत. बालपणापासून ते सद्यस्थितीपर्यंत नरेंद्र मोदी कशा प्रकारे त्यांच्या जीनवमुल्यावर हे आयुष्य जगले आणि त्यातून इतरांना प्रेरित करत राहिले याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळात देशात घडलेल्या घडामोडींची दखल घेत त्यावर आधारित दृश्यही चित्रपटात साकारण्यात आली आहेत. 'मेरा गुजरात जल रहा है...', असं म्हणताना नरेंद्र मोदी यांची गुजरातप्रती असणारी आपुलकी आणि त्यांचं भावुक रुप प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. 

एकिकडे गुजरातमधील परिस्थितीमुळे चिंतातूर झालेले मोदी आणि दुसरीकडे देशाच्या पंतप्रधान पदी असताना जबाबदारी ओझं वाहत पाकिस्तानच्या कारवायांवर त्यांना खडसावणारे मोदी पाहताना नजरा ट्रेलरमधील दृश्यांवर खिळतात. 'पाकिस्तानला मी आव्हान देतो, पुन्हा जर मजाल केलीत तर हात कापेन', असं म्हणणारे मोदी पाहता त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक आणि इतर महत्त्वाचे निर्णय लक्षात येतात. एकंदरच पंतप्रधान पदावर पोहोचत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता, यावर सुरेख प्रकाशझोत टाकल्याचं ट्रेलर पाहताच लक्षात येत आहे.