लग्नाआधीच गर्भवती होती Alia Bhatt? डिलिव्हरीच्या तारीख समोर येताच मोठा खुलासा

अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य   

Updated: Oct 29, 2022, 01:08 PM IST
लग्नाआधीच गर्भवती होती Alia Bhatt? डिलिव्हरीच्या तारीख समोर येताच मोठा खुलासा title=

Alia Bhatt pregnancy : राझी,  गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), डार्लिंग्ज (Darlings) आणि ब्रह्मास्त्र (Brahmastra) यांसारख्या पाठोपाठ यशानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आता आईची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. आलिया लवकर तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. नोव्हेंबरमध्ये कपूर कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण अद्याप अभिनेत्रीच्या डिलिव्हरीच्या तारीख समोर आली नाही. (alia bhatt delivery date)

पण रिपोर्टनुसार, आलिया 20-30 नोव्हेंबर बाळाला जन्म देवू शकते. असाही दावा केला जात आहे की आलियाची डिलिव्हरीची तारीख बहीण शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या आसपास असू शकते. शाहीनचा वाढदिवस 28 नोव्हेंबरला असतो. (alia bhatt and ranbir kapoor)

लग्नाआधी प्रेग्नेंट होती आलिया भट्ट (What is the qualification of Alia Bhat?)
आलियाची डिलिव्हरीची तारीख बरोबर असेल तर आलिया लग्नाआधी गरोदर होती, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत झाले होते. (Is Alia Bhatt vegan?)
 
त्यानुसार, लग्नापासून त्यांच्या प्रसूतीच्या तारखेपर्यंत केवळ 7 महिने पूर्ण होत आहेत, ज्यावरून स्पष्ट होतं की लग्नाआधीच आलिया प्रग्नेंट होती. कारण दोघांच्या लग्नाला नोव्हेंबरमध्ये 7 महिनेपूर्ण होत आहेत. 

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना दिली 'गुडन्यूज' 
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलिया भट्टने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. सोनोग्राफी दरम्यानचा फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केला होता. शिवाय मॉनिटरवर एक हार्ट इमोजी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (Alia bhatt goodnews)