व्हिडिओ : 46 वर्षांच्या मंदिरानं रॅम्पवरच केलं असं काही की दर्शकांनाच फुटला घाम!

तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच वायरल होताना दिसतोय. 

Updated: May 11, 2018, 06:50 PM IST
व्हिडिओ : 46 वर्षांच्या मंदिरानं रॅम्पवरच केलं असं काही की दर्शकांनाच फुटला घाम! title=

मुंबई : टीव्ही जगतातली 'फिटनेस फ्रिक' आणि बोल्ड अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा एकदा चर्चेत आलीय... नुकत्याच एका रॅम्पवर मंदिरा दिसली... या रॅम्पवर मंदिरा फक्त चाललीच नाही तर तिनं रॅम्पवरच पुशअप्स मारले... 46 वर्षीय मंदिराचा हा हॉट अवतार बघून समोर बसलेल्या प्रेक्षकांनाच घाम फुटलेला दिसला.

क्रिकेट आणि छोट्या-मोठ्या पडद्यावर दिसणारी मंदिरा रॅम्पवर अवतरली... तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच वायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ 'ट्रम्फ फॅशन शो 2018' दरम्यानचा आहे... यामध्ये मंदिरा रॅम्पवरच पुशअप्स करताना दिसतेय. 

And then I said #whynot !! Thode se push-ups bhi ho jayein!! . . . #triumphfashionshow2018 #triaction Thank you @rajkaushal for the video!

को Mandira Bedi (@mandirabedi) द्वारा साझा की गई पोस्ट

आपल्या फॅन्ससाठी मंदिरा अनेकदा सोशल मीडियावरून आपल्या फिटनेस फंडे, फोटो, व्हिडिओ सतत शेअर करताना दिसते. यापूर्वीही तिनं इन्स्टाग्रामवर हॉट बिकिनी फोटो शेअर केले होते. 

मंदिराचा हा हॉट अवतार पाहून उपस्थितांपैंकी अनेकांना घाम फुटला.. परंतु, नंतर मात्र प्रेक्षकांनी एकच कल्ला केला... आणि टाळ्या वाजवून तिचं कौतुकही केलं. 

मंदिरानंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय 'खेळावर माझं प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यात फिटनेस खूप महत्त्वाचा आहे... अनेकदा सपोर्टसाठी खूप मेहनत घ्यावी लागते... परंतु, मला तो मिळालाय'.

These days, this is my thing !! Thank you @thenitinmirani for shooting it and then putting music to it.. and making it look better than it was!!

को Mandira Bedi (@mandirabedi) द्वारा साझा की गई पोस्ट

1994 साली आलेल्या 'शांती' या कार्यक्रमातून मंदिरा बेदीला खूपच प्रसिद्धी मिळाली होती... प्रत्येक घरात ती ओळखली जाऊ लागली... यानंतर शाहरुख खान आणि काजलसोबत ती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमातही दिसली होती.