अभिनेते ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पाहिली?

रणबीर - आलियाच्या लग्नाच्या चर्चां रंगत असताना  ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल   

Updated: Apr 8, 2022, 03:33 PM IST
अभिनेते ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पाहिली? title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या चर्चां रंगत असताना अभिनेत्री ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र ऋषी आणि नितू यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा सुरू आहे. फार जुनी त्यांची पत्रिका चाहत्यांना देखील फार आवडत आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका पाहून तुम्हाला देखील तुमच्या खास क्षणांची आठवण जागी झाली असेल.

1980 साली ते विवाह बंधनात अडकले होते. ऋषी आणि नीतू यांनी 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. ऋषी आणि नीतू यांना दोन मुलं आहेत. रणबीर कपूर आणि रिधिमा कपूर अशी त्यांची नावे आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऋषी आणि नीतू 'खेल खेल में', 'रफू चक्कर', 'कभी कभी', 'अमर अकबर एंथनी', 'दुनिया मेरी जेब में', 'जहरीला इंसान', 'जिंदा दिल', 'दूसरा आदमी', 'अनजाने में' और 'झूठा कहीं का' या चित्रपटांच्या माध्यमातून एकत्र झळकले होते. 

1970 ते 1990 हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'कर्ज' या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. 

आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.