तुझ्या रुपाचं चांदणं.... Saree लूकमध्ये 'या' अभिनेत्रीइतकं सुंदर दुसरं कोणीच दिसलं नसावं

Saree लूक चुकवतोय काळजाचा ठोका   

Updated: Dec 15, 2021, 05:07 PM IST
तुझ्या रुपाचं चांदणं.... Saree लूकमध्ये 'या' अभिनेत्रीइतकं सुंदर दुसरं कोणीच दिसलं नसावं  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : काही अभिनेत्री या त्यांच्या अभनयासोबतच अतिशय देखण्या रुपासाठीही सतत चर्चेत असतात. त्यांचं  साधं स्मितहास्यही काळजाचा ठाव घेणारं ठरतं. अशाच अभिनेत्रींपैकी एका, किंबहुना अशा अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या एका सौंदर्यवतीनं तिच्या सोशल मीडियावरव काही फोटो शेअर केले आहेत. 

फोटोंमध्ये ती saree लूकमध्ये दिसत आहे. भरजरी तरीही तितक्याच सुंदर अशा साडीमध्ये नजरा वळवणारी ही अभिनेत्री आहे साई पल्लवी. 

साई पल्लवीनं इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती स्लिव्हलेस ब्लाऊज घालून त्यावर त्याच रंगाच्या फुलांची प्रिंट असणारी सिल्क साडी नेसलेली दिसत आहे. 

तिचा हा लूक, मोकळे केस आणि त्यामध्ये माळलेला एक गजरा हे सारं गणित इतक्या सुंदररित्या जमलं आहे की त्यापुढे काय बोलावं हेसुद्धा सुचत नाहीये. 

दाक्षिणात्य कलाजगतामध्ये साई पल्लवी हे नाव काही नवं नाही. मुख्य म्हणजे या अभिनेत्रीला विविधभाषी प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. 

भरमसाट मेकअपला झुगारत नैसर्गिक सौंदर्याच्याच बळावर चित्रपट स्वीकारणारी आणि भूमिका साकारणारी साई पल्लवी ही तिच्या परखड मतांसाठीही ओळखली जाते. 

अभिनयासोबतच ती नृत्यकलेतही तितकीच पारंगत आहे. ज्यामुळं ती जेव्हाजेव्हा समोर येते, तेव्हातेव्हा हृदयाची धडधड वाढते, अशीच काहीशी चाहत्यांची अवस्था होते.