सैफला एका महिलेसोबत घरात पाहून अशी होती करीनाची प्रतिक्रिया?

त्याच्यासोबत घडलेल्या विचित्र घटनेचा उल्लेख केला.

Updated: Nov 19, 2021, 12:10 PM IST
सैफला एका महिलेसोबत घरात पाहून अशी होती करीनाची प्रतिक्रिया? title=

मुंबई : सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'बंटी और बबली 2' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांच्यासह चित्रपटाचे कलाकार अनेक रिअॅलिटी शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचले होते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, संभाषणात राणी आणि सैफ अनेक जुन्या गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत.

कधी-कधी सेलेब्ससोबत अशा घटना घडतात, ज्या त्यांच्या समजण्याच्या पलीकडे असतात. सैफसोबतही असंच काहीसं घडलं आहे. अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा एक अनोळखी महिला त्याच्या घरात घुसली तेव्हा करीना कपूर खानने अशी प्रतिक्रिया दिली.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान आता त्यांच्या वांद्रे येथील नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. यापूर्वी दोघेही फॉर्च्युन हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहत होते. यशराज फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर सैफ अली खानने राणी मुखर्जीसोबतच्या संभाषणादरम्यान त्याच्यासोबत घडलेल्या विचित्र घटनेचा उल्लेख केला.

Did you know that Kareena Kapoor Khan was warned against marrying Saif Ali  Khan ? | Hindi Movie News - Times of India

सैफ म्हणतो, 'जेव्हा आमच्या घराची बेल वाजली, तेव्हा मी दरवाजा उघडला, तेव्हा एक अनोळखी महिला घरात आली आणि म्हणाली, 'बरं, तू इथे राहतोस'. यावर सैफ म्हणतो की, मला माहिक नाही, पण ती पूर्ण आत्मविश्वासाने थेट आमच्या घरात आली. तिने चांगले कपडे घातले होते, काहीही चुकीचे वाटत नव्हते, त्यामुळे तिला कोणीही अडवले नसावे.

सैफ अली खान पुढे सांगतो की, करीना आणि मी तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत होतो. यानंतर माझ्याकडे बघून करीना म्हणाली, 'तू काही बोलणार नाहीस का?. सैफने सांगितले की, एक बाई अशा प्रकारे घरात आल्याने मी खूप घाबरलो होतो आणि काय करावे हे मला समजत नव्हते आणि विचार करत होता की मला या महिलेला ओळखतो का ? मी म्हणालो कि तू इथे काय करते आहेस, त्यावर बाई म्हणाली कि ठीक आहे, मग वळून ती बाहेर गेली.