प्रियंका चोप्राच्या बाळाचं नाव काय? अभिनेत्रीची आई म्हणाली...

चोप्रा आणि जोनस कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर सोशल मीडियावर युजर्स  दोघांचे अभिनंदन करत आहेत.  

Updated: Feb 28, 2022, 08:13 AM IST
प्रियंका चोप्राच्या बाळाचं नाव काय? अभिनेत्रीची आई म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचे आज जगभरात चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीद्वारे आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्राच्या बाळाची चर्चा सतत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

प्रियंका आणि निकच्या बाळाचं नाव काय आहे? शिवाय त्यांच्या बाळाची पहिली झलक पाहाण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. पण चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असं प्रियंकाच्या आईने दिलेल्या स्पष्टीकरणातून समोर येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या कॉस्मेटिक क्लिनिकला 14 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा पापाराझींसोबत बोलताना त्या म्हणाल्या, 'आजी झाल्यामुळे फार आनंदी आहे.. पूर्ण दिवस मी आनंदी असते...'

पुढे त्यांना प्रियंकाने बाळाचं नाव काय ठेवलं असा प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्य, 'अद्याप नाव ठेवलेलं नाही. जेव्हा पंडित सांगतील तेव्हा नाव ठेवू..' असं त्या म्हणाल्या..

चोप्रा आणि जोनस कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर सोशल मीडियावर युजर्स  दोघांचे अभिनंदन करत आहेत. प्रत्येक जण जोडप्याच्या छोट्या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.