अभिनेता अजय देवणला 'या' कारणामुळे दोनदा जावं लागलं होतं जेलमध्ये

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे

Updated: Apr 2, 2022, 08:12 PM IST
अभिनेता अजय देवणला 'या' कारणामुळे दोनदा जावं लागलं होतं जेलमध्ये title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. एक्शनच्या बाबतीत अजय अनेक मोठ-मोठ्या कलाकारांना टक्कर देतो. कॉलेजच्या काळात अजयला गुंडा म्हणायचे एवढंच नाही तर एकदा अजयने वडिलांची बंदूकही चोरली होती. आज अजयच्या वाढदिवसानिमित्त आम्‍ही तुम्‍हाला त्‍याच्‍याबद्दल काही खास गोष्‍टी सांगणार आहोत. ज्या तुम्हालाही माहीत नसतील.

2018 मध्ये एका मुलाखतीत अजय देवगणला त्याच्या कॉलेज लाइफबद्दल विचारण्यात आलं होते. यावेळी त्याने सांगितलं की, तो कॉलेजच्या काळात गुंड होता. एवढंच नाही तर दोनदा त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. अजयने सांगितलं की, त्याने आयुष्यात कधीही संघर्ष केला नाही. मी कॉलेजमध्ये असताना मला चित्रपट बनवण्याची आवड होती.

वडिलांना करायचा मदत
अजय पुढे म्हणाला की, जेव्हा मी ८-९ वर्षांचा होतो, तेव्हा मी माझ्या वडिलांना चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये मदत करू लागलो. त्यावेळी अ‍ॅक्शन सीक्वेन्स एडिट करणं खूप अवघड असायचं. वयाच्या १२-१३ व्या वर्षी मी स्वतःचे चित्रपट बनवायला सुरुवात केली. माझ्या वडिलांनी मला कॅमेरा दिला. मी खूप स्पेशल इफेक्ट्स द्यायचो. स्वतःचे सेट स्वतः बनवायचो. वयाच्या १५ व्या वर्षी माझ्या वडिलांनीही मला शूटिंगसाठी पाठवायला सुरुवात केली.