आकाश अंबानी - श्र्लोकाचा 'लिप लॉक' व्हायरल

आकाश-श्र्लोकाचं 9 मार्चला झालं लग्न

Updated: Oct 1, 2019, 02:32 PM IST
आकाश अंबानी - श्र्लोकाचा 'लिप लॉक' व्हायरल title=

मुंबई : अंबानी कुटुंबियात यंदा दोन लग्न झाली. या दोन्ही लग्नांची जोरदार चर्चा देखील रंगली. लग्न मार्च महिन्यात होऊनही आकाश अंबानी आणि श्र्लोका मेहता आजही चर्चेत आहेत. 

आकाश आणि श्र्लोका यांच 9 मार्च रोजी लग्न झालं. श्र्लोका तिच्या लग्नसोहळ्यात खूप सुंदर दिसत होती. श्र्लोका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव नसते पण तिचे चाहते खूप असल्यामुळे फॅनपेज आहेत. यावर आकाश आणि श्र्लोकाच्या रिसेप्शनचा एक जुना व्हिडिओ शेअर झाला आहे. हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे. 

या पार्टीत श्र्लोका गोल्डन रंगाचा गाऊन घातला होता. तर आकाशने काळ्या रंगाचा सूट घातला होता. या सोहळ्यात ही जोडी खूप सुंदर दिसत होती. याच पार्टीचा इनसाइड व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आकाश आणि श्र्लोका एकत्र डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करता श्र्लोकाला आकाशने लिपलॉक केलं. लिपलॉक करताच उपस्थित पाहुण्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. 

श्र्लोका देखील किस केल्यानंतर लाजली. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोमँटिक क्षणानंतर आकाशने आपला लहान भाऊ अनंत आणि त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चेंटला चिअर अप केलं. आकाश आणि श्र्लोका यांच्यासोबत पाहुण्यांनी देखील अनंतला 'We Want Kiss' म्हणत आग्रह केला. पण अनंत आणि राधिकाने असं करण्यास नकार दिला. 

श्र्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता. मनीष मल्होत्राने स्वतः आकाश आणि श्र्लोकाचा फोटो शेअर केला होता. अंबानी कुटुंबियांना तीन मुलं आहेत. आकाश आणि ईशा यांच लग्न झालं असून अनंत अंबानीचं लवकरच लग्न होणार आहे.