...जेव्हा सलमान खानला मार-मारून उन्हात उभं केलं गेलं! त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Salman Khan Birthday :  गेली तीन दशकं सलमान खान सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत या काळात त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सलमान आज 2912 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र त्याच्यावर अनेकदा आर्थिक संकटेही आली आहेत.

Updated: Dec 27, 2023, 02:48 PM IST
...जेव्हा सलमान खानला मार-मारून उन्हात उभं केलं गेलं! त्या दिवशी नेमकं काय घडलं? title=

Salman Khan 58th Birthday : अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग खूप  मोठा आहे. आज अभिनेत्याचा प्रत्येक वर्गात चाहता आहे. सलमान खान प्रोफेशनल आयुष्यात जितका चर्चेत असतो तितकाच चर्चेत तो तिच्या पर्सनल आयुष्यातही चर्चेत असतो. आज अभिनेता त्याचा  58 वा  वाढदिवस साजरा करत आहे. गेली तीन दशकं सलमान खान सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत या काळात त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सलमान आज 2912 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

मात्र त्याच्यावर अनेकदा आर्थिक संकटेही आली आहेत. असंच त्याच्यावर एकदा आर्थिक संकट असताना त्याने 100 रुपयांच्या नोटा जाळल्या, त्यामुळे त्याचे वडील सलीम खान चांगलेच संतापले. त्याला याची शिक्षाही भोगावी लागली. सलमानला धडा शिकवण्यासाठी सलीम खान यांनी जे केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आज अभिनेता त्याचा   58 वा  वाढदिवस साजरा करत आहे याच निमीत्ताने आम्ही तुम्हाला अभिनेत्याचा हा किस्सा सांगणार आहोत.

'फिल्मफेअर'ला दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने त्याच्या बालपणीचा किस्सा सांगितला होता. यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती असं सलमान म्हणाला. सलमान पुढे म्हणाला, वडिलांची कमाई केवळ घरं चालवण्या इतकीच होती. 

सलमानने वडिलांचा एक महिन्याचा पगार जाळला होता.
पुढे मुलाखतीत सलमानने सांगितलं की, एकदा त्याने त्याच्या वडिलांचा एक महिन्याचा संपुर्ण पगार जाळून टाकला होता. यावेळी तो खूप लहान होता. त्याच्या या कृत्यामुळे घरात सगळ्यांचा गोंधळ उडाला. यामुळे त्याचे वडील सलीम खान खूप संतापले होते.    

सलमान पुढे म्हणाला की, त्याच्या वडिलांना तेव्हा ७०० रुपये इतका पगार असताना त्याने 100 रुपयांच्या सात नोटा जाळल्या होत्या. यावेळी  तो आणि त्याचे दोन भाऊ वडिलांसोबत बाहेक जात होते. मात्र त्याआधीच हा सगळा पराक्रम सलमानने केला. त्यामुळे त्याचे वडिल खूप चिडले. यानंतर सलमानच्या वडिलांनी त्याला मोठी शिक्षाही दिली. सलमानला यावेळी सलीम यांनी खूप मारलंही. याचबरोबक त्यांनी आपल्या मुलाला धडा शिकवण्याचं ठरवलं. आणि त्याला उन्हात उभं केलं.
 
नुकताच सलमानने त्याची बहिण अर्पिताच्या घरी त्याचा वाढदिवस साजरा केला. सलमान त्याचा वाढदिवस कायम त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर साजरा करतो मात्र यावेळी त्याने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटूंबीयांसोबत आणि त्याच्या मित्रपरिवाराोबत साजरा केला.