कतरिनाच्या मेहंदीमध्ये कुठे दडलंय विकीचं नाव...

कतरिनाच्या  मेहंदीचा गडद रंग...  

Updated: Dec 19, 2021, 10:44 AM IST
कतरिनाच्या मेहंदीमध्ये कुठे दडलंय विकीचं नाव... title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने नव्या आयुष्याची सुरूवात अभिनेता विकी कौशल सोबत केली आहे. 9 डिसेंबर रोजी दोघांनी जयपूरमध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. आता विकी-सैफच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोने  सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो फोटो आहे कतरिनाच्या मेहंदीचा आहे.  

हातात बांगड्या घातलेल्या कतरिनाने कॅमेऱ्यासमोर फक्त मेहंदी लावलेले हात दाखवले आहेत. तिच्या मेहंदीचा रंग देखील फार गडद आहे. तिच्या मेहंदीची डिझाईन अतिशय सुंदर आहे.  कतरिनाच्या हातावर मेहंदी उठून दिसत आहे. हे जोडपे हनिमूनसाठी मालदीवला गेले होते याचा पुरावा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आता नववधूच्या मेहंदीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मेहंदीमध्ये दडलंले पतीचं नाव. कतरिनाच्या मेहंदीमध्येही विकीचे नाव दडले आहे. कतरिनाच्या मेहंदीमध्ये तुम्हीही विकीचे नाव शोधत असाल, तर कतरिनाने तळहाताच्या अनामिकेवर विकीचे नाव मेहंदीने लिहीले आहे.

कतरिना आणि विकी यांचा विवाह 9 डिसेंबर रोजी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे झाला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर हे जोडपे मालदीवला रवाना झाले. आता लग्नानंतर दोघांना कामाला सुरूवात केली आहे.