OMG 2 मधील दमयंती कोण तुम्हाला माहितीये? कोर्टात हस्तमैथूनचा धडा देत केली सगळ्यांची बोलती बंद

Who is Anvesha Vij : सध्या OMG 2 हा चित्रपट प्रचंड गाजताना दिसतो आहे. यावेळी या चित्रपटातून पंकज त्रिपाठीच्या मुलीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा आहे. तुम्हाला माहितीये का की नक्की अन्वेषा वीज आहे कोण? आणि सोबतच तिला ही भुमिका कशी मिळाली? 

Updated: Aug 23, 2023, 05:22 PM IST
OMG 2 मधील दमयंती कोण तुम्हाला माहितीये? कोर्टात हस्तमैथूनचा धडा देत केली सगळ्यांची बोलती बंद  title=
who is anvesha vij pankaj tripathi onscreen daughter trending news on google

Anvesha Vij : सध्या OMG 2 हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. या चित्रपटातून फार संवेदनशील विषयी पुढे आला आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा रंगेलली आहे. या चित्रपटातून पंकज त्रिपाठीच्या ऑनस्क्रिन मुलीची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. हिचं नावं आहे अन्वेषा वीज. सध्या तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. चित्रपटात कोर्टात सगळ्यांसमोर हस्तमैथूनाचा अर्थ सांगणाऱ्या पंकज त्रिपाठीच्या या ऑनस्क्रीन अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अन्वेषा नक्की कोण आहे? अन्वेषा हिनं याआधीही काही चित्रपटांमधून कामं केली आहेत. 

या चित्रपटातून तिनं दमयंतीची भुमिका केली आहे. जी सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजते आहे. सोबतच तिचा लुकही फार चांगलाच गाजतो आहे. यावेळी ती या चित्रपटात शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसते आहे. त्यात तिनं दोन वेण्याही घातल्या आहेत. एरवी युनिफॉर्म नसताना ती पंजाबी ड्रेस आणि वेणीत दिसते आहे. त्यामुळे तिच्या भोळेपणाची, निरागसतेची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. अन्वेषानं अभिनयात प्रशिक्षिण घेतेले आहे आणि सोबतच तिनं 'क्रॅश कोर्स' या वेबसिरिजमध्येही काम केले आहे. त्यातून तिच्या या सिरिजमधील अभियनयाचेही फार कौतुक केले आहे. चला तर मग जाणुन घेऊया तिच्याविषयी आणखी काही... अन्वेषा ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. सोबतच तिच्या फोटोंचीही अनेकदा चर्चा रंगताना दिसते. 

करण जोहरला जेव्हा ट्रोलर्स सुनावतात, हेही वाचा : ''माझ्या नावापुढे सापाचा इमोजी लावणारे...'' करण जोहरकडून इतके दिवस साठवलेलं दु:ख अखेर समोर

अन्वेषानं दिल्ली युनिर्वसिटीच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून शिक्षण घेतले आहे. एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली आहे तिला OMG 2 हा चित्रपट नक्की कसा मिळाला? ती म्हणाली की, '' मी आधी दिल्लीला ऑडिशन दिली होती. मला नॉर्मल ऑडिशनप्रमाणेच ही ऑडिशन होती. त्यावेळी मला माहिती नव्हतं की ऑडिशन OMG 2 या चित्रपटासाठी आहे. पहिल्या राऊंडमध्येच मला शॉर्टलिस्ट करण्यात आले. तेव्हा मला कळलं की ही ऑडिशन OMG 2 साठी आहे. त्यानंतर 3-4 राऊंड्स अजून झाले आणि मग माझी निवड झाली.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 यावेळी तिनं पंकज त्रिपाठीबद्दल सांगितले की, ''मी पंकज त्रिपाठी यांच्या मुलीचा रोल करत होते त्यामुळे माझा सर्वाधिक सेटवरील वेळ त्यांच्यासोबतच होता. ते फार सपोर्ट करतात. आपल्या अनुभवांविषयी सांगतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची खूप चांगली संधी मिळाली होती. '' असं ती म्हणाली.