कोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?

Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 23, 2023, 01:11 PM IST
कोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये? title=
(Photo Credit : Social Media)

Varun Dhawan - Sidharth Malhotra : 'कॉफी विथ करण'चा 8 वा सीझन सुरु आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती. या चित्रपटातून फक्त या दोघांनीच नाही तर अभिनेत्री आलिया भट्टनं देखील पदार्पण केलं होतं. मात्र, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की हे दोघेही आलियाच्या कास्टिंगच्या विरोधात होते. याचा खुलासा करणनं 'कॉफी विद करण 8' केला आहे. त्यानं केलेला हा खुलासा ऐकल्यानंतर आलियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

करण जोहरनं यावेळी सांगितलं की वरुण आणि सिद्धार्थ हे दोघं 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटात आलियाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा सल्ला देत इतर अभिनेत्रींचे फोटो पाठवायचे. सिद्धार्थ आणि वरुणला वाटलं नव्हतं की करण शोमध्ये हा खुलासा करेल. करणनं सांगितलं की आता आलिया, वरुण आणि सिद्धार्थमध्ये चांगलं बॉन्डिंग असेल, पण सुरुवातीला या दोन्ही अभिनेत्यांना आलिया चित्रपटात नको होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण याविषयी सांगताना म्हणाला, 'मला अजूनही आठवण आहे की जेव्हा आलिया पहिल्यांदा आली होती, तेव्हा तुम्ही दोघांनी मला कसे मेसेज केले होते की तुम्ही तिला कास्ट नाही करू शकतं. तुमच्यापैकी एकानं सांगितलं होतं की ती खूप छोटी आहे. त्याची सुरुवात अशी झाली होती. पण जेव्हा या घटनेच्या तीन महिन्यांनंतर आलिया फोटोशूटसाठी आली तेव्हा ती शांत होती. तिनं तुमच्या दोघांपैकी कोणाकडेच पाहिलं नाही. एकतर ती लाजत होती किंवा मग ती खूप कॉन्शियस झाली होती, कारण तुम्ही मला आधी पासून ओळखत होतात. दुसरीकडे ती मला ओळखत नव्हती. आपण फोटोशूट केलं आणि त्याच्या थोड्यावेळात, म्हणजेच मला पहिल्या शॉटमध्येच कळलं होतं.'

हेही वाचा : सारा खाननंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन! स्टेटस ठेऊन केलं कन्फर्म?

याविषयी सविस्तर सांगताना करणनं खुलासा केला की वरुण धवन त्याला दुसऱ्या अभिनेत्रींचे फोटो दाखवायचा आणि बोलायचा की आलियाच्या जागी यांच्यापैकी कोणालाही कास्ट कर. पण करणनं त्याचं ऐकलं नाही आणि त्यानं घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिला. 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसेल, पण या चित्रपटानं चित्रपटसृष्टीला तीन कलाकार दिले. या चित्रपटानंतर आलिया सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. तर त्याच्यासोबत 'कपूर अॅन्ड सन्स' या चित्रपटात दिसली. तर वरुण धवनसोबत आलियानं 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'कलंक' हे चित्रपट केले.