Sanjay Leela Bhansali Birthday : भन्साळी वडिलांऐवजी का लावतात आईचं नाव? रंजक गुपित अखेर समोर

Sanjay Leela Bhansali Birthday : दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन या आणि अशा अनेक कलाकारांच्या किरकिर्दीत महत्वाची भूमिका बजावणारे भन्साळी 60 वर्षांचे झाले आहेत. 

Updated: Feb 24, 2023, 10:05 AM IST
Sanjay Leela Bhansali Birthday : भन्साळी वडिलांऐवजी का लावतात आईचं नाव? रंजक गुपित अखेर समोर  title=
why bollywood Director sanjay leela bhansali uses his mothers name instead of father secret revealed on his birthday

Sanjay Leela Bhansali Birthday : लार्जर दॅन लाईफ चित्रपट साकारत या रुपेरी पडद्यावर कुंचल्यातील अनेक रंगांची उधळण करणारे दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. चित्रपटाच्या कथेला न्याय देत जीव ओतून तो साकारण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या या कलासक्त भन्साळींचा 24 फेब्रुवारीला 60 वा वाढदिवस. या निमित्तानं त्यांच्यावर कलाजगतातून अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  (Sanjay Leela Bhansali) संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पाहताना त्यामध्ये भावभावना, पात्रांचे गुणविशेष आणि इतरही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. चित्रपटांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दिग्दर्शकाच्या जीवनात आणखी एका व्यक्तीला खास स्थान आहे. ती म्हणजे त्यांची आई. 

तुम्ही (Bhansali Movies) भन्साळींचं पूर्ण नाव कधी वाचलंय का? संजय लीला भन्साळी.... काही अंदाज येतोय? ते वडिलांऐवजी आईचं नाव जोडतात. यामागेही एक रंजक कारण आहे. 

आईचं नाव लावण्यास कारण की... 

संजय लीला भन्साळींचे (Sanjay Leela Bhansali) वडील एक निर्माते होते. पण, त्यांना अपेक्षित यश मिळालं नव्हतं. हे अपयश पचवण्यासाठी मग त्यांनी मद्याचा आधार घेतला. ते असे काही मद्याच्या आहारी गेले की कौटुंबीक जबाबदाऱ्यांचं भानच त्यांना राहिलं नाही. त्यावेळी आईनं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत गुजराती रंगभूमीवर त्या सक्रीय झाल्या. नृत्य करत त्यांनी कुटुंबासाठी पैसे कमवण्यास सुरुवात केली. 

हेसुद्धा वाचा : Maanvi Gagroo ने लपून केलं लग्न! Four More Shots Please, Tripling मुळे आली प्रकाशझोतात

 

इतक्यावरच न थांबता भन्साळींच्या (sanjay Leela Bhansali Mother) आईनं शिवणकाम सुरु केलं आणि मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण करून घेतलं. आपल्या बालपणीच भन्साळींना हे दिवस पाहावे लागले होते. आईचा संघर्षही त्यांनी पाहिला होता. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतही जिद्द सोडली नव्हती. मुलांचं संगोपन करत त्यांनी त्यांना उत्तम शिक्षणही दिलं. ज्यामुळं आईशी असणारं भन्साळींचं नातं आणखी दृढ झालं. आईनं आपल्यासाठी केलेले सर्व प्रयत्न आणि मेहनत पाहता तिच्या संघर्षाला सलाम करत भन्साळींनी जगापुढे संजय लीला भन्साळी अशी ओळख सांगण्यास सुरुवात केली आणि आईचं नाव त्यांच्या नावासोबतच मानानं घेतलं जाऊ लागलं. 

भन्साळींविषयी खास माहिती... 

शालेय शिक्षण पूर्ण करण्यानंतर संजय लीला भन्साळींनी पुण्यातील एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. तिथून त्यांनी थेट मुंबई गाठली. त्यावेळी विधू विनोद चोप्रा 'परिंदा' नावाचा चित्रपट साकारत होते. भन्साळींना पाहून तेसुद्धा भारावले. त्यांनी भन्साळींना असिस्टंट म्हणून निवडलं. ज्यावेळी चित्रपट पूर्ण झाला तेव्हा स्क्रीनवर जाणाऱ्या नावांची यादी त्यांनी मागवली आणि त्यात संजय लीला भन्साळी, असं नाव या नवख्या मुलानं लिहिलं होतं. आईचे ऋण त्यांना फेडणं अशक्य होतं, पण तिचा मान वाढेल असं कृत्य या मुलानं केलं होतं.