भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्याची लेक रुग्णालयात

भाऊ कदम सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. भाऊ चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तशीच त्याची मोठी लेक मृण्मयी कदम ( Mrunmayee Kadam) देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरु लागली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र तिच्या बाबतीत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Updated: Apr 26, 2023, 03:23 PM IST
भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्याची लेक रुग्णालयात title=

मुंबई : अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) त्याच्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. 'फू बाई फू' (Fu Bai Fu) या शोमधून भाऊला खरी ओळख मिळाली. पण 'चला हवा येऊ द्या' ( Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातून तो घरांघरात पोहचला. भाऊचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याची कॉमेडी प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर उचलून धरली की, त्याच्या डायलॉग्सच्या रिल्सवर त्याचे चाहते व्हिडिओ क्रिएट करु लागले. भाऊ हा मराठी इंडस्ट्रीतला असा हिरो आहे ज्याने सुरुवातीच्या दिवसांत खूप संघर्ष केला.भाऊ कदम याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावरही अभिनेता कायम सक्रिय असतो.  

भाऊ कदम सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. भाऊ चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तशीच त्याची मोठी लेक मृण्मयी कदम ( Mrunmayee Kadam) देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरु लागली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 

मृण्मयी सोशल मीडियावर नेहमीच तिचे क्रिएटीव्ह व्हिडिओ शेअर करत असते. जास्त ते मृण्मयी मेकअप आणि फॅशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मृण्मयी एक युट्यूबर देखील आहे. अनेकदा ती तिच्या कुटूंबीयांसोबतही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पण मृण्मयीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. मृण्यमयी तिच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हाताला सलाईन लावल्याचं दिसत आहे. 

''माझ्या परीक्षे शेवटच्या दोन पेपरवेळी  माझ्या हाताने परीक्षेचं लेखन करणं जवळजवळ सोडून दिलं.  मलाही असं वाटलं होतं की, माझी परीक्षा लिहिणं माझ्यासाठी अशक्य होतं. तरीही मी माझ्या पेपरमध्ये भाग घेतला. माझ्या शरीरात अजिबात ताकद नसताना. यातच माझ्या मासिक पाळीलाही यायचं होतं. पण मी आनंदाने हे सगळं सहन केलं. 

काही सिरीयस नाहीये. फक्त व्हिटॅमिन आणि कॅल्शियम कमी झालं आहे. बाकी मी मस्त आहे. एवढंच नव्हे या पोस्टमध्ये तिने पुढे लिहीलंय की,   बस व्हॉईस ओवर बाकी आहे. मेकअप मालिकेच्या ep2 साठी आज 5-6 आधी पोस्ट करत आहे.'' अशी पोस्ट मृण्मयीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे.

 

मृण्मयची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मृण्मयी कदम ही २१ वर्षांची आहे.  चला हवा येऊ द्या' या (Chala Hawa Yeu Dya) कॉमेडी शोने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.